पीएम किसान योजनेच्या लाभार्थांना मिळणार स्वस्तात लोन; जाणून घ्या

दैनिक गोमंतक
रविवार, 16 मे 2021

मोदी सरकार पीएम किसान लाभार्थ्यांना स्वस्त दराने कर्जदेखील पुरवते.

पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) आठवा हप्ता जाहीर करण्यात आला आहे. दोन हजार रुपयांच्या या हप्त्याचे शेतकऱ्यांच्या  खात्यात टाकणे सुरू झाले आहे. जर आपण देखील या योजनेत नोंदणीकृत असाल तर आपण पंतप्रधान किसान योजनेच्य  8 व्या हप्त्याची स्थिती तपासू शकता आणि आपल्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्याला पंतप्रधान किसान https://pmkisan.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.(Beneficiaries of PM Kisan Yojana will get cheap loans)

Cyclone Tauktae: आजच्या वादळाचे 12 वर्षांपूर्वी केले होते भाकीत, मात्र...

मोदी सरकार पीएम किसान लाभार्थ्यांना स्वस्त दराने कर्जदेखील पुरवते. हे कर्ज आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या किसान क्रेडिट कार्ड वर उपलब्ध आहे. मागील वर्षी प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेत समाविष्ट करण्याचे निर्देश केंद्र सरकार कडून देण्यात आले होते. यानंतर बँक आणि इतर संस्थांनी कर्ज घेणाऱ्या शेतकर्‍यांना केसीसी प्रधान किसान निधी योजनेशी जोडली. यामुळे शेतकऱ्यांना सुलभ हप्ते आणि कमी व्याजात कर्ज मिळत आहे. आपण पंतप्रधान किसान योजनेचे लाभार्थी असाल तर या योजनेचा लाभ घेऊ शकता.

खालील कागदपत्रे लागतील
किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म पीएम किसान योजनेच्या वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर देण्यात आला आहे. यामध्ये स्पष्ट सूचना आहे की बँका केवळ 3 कागदपत्रे घेऊन कर्ज देऊ शकतात. किसान कार्ड  बनविण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो या सारखे कागदपत्र लागतात. तसेच आपण अन्य कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतलेले नाही असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल.

CYCLONE TAUKTAE: तौकते वादळाचे लाईव्ह लोकेशन पहा तुमच्या मोबाईलवर

खालील बँकेत करू शकता संपर्क
किसान को-ऑपरेटिव बैंक 
क्षेत्रीय ग्रामीण बैंक 
नेशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया
स्टेट बैंक ऑफ इंडिया (SBI)
बैंक ऑफ इंडिया (BOI)
इंडस्ट्रियल डेवलपमेंट बैंक ऑफ इंडिया (IDBI)

संबंधित बातम्या