स्टाईलच्या युगात या टू व्हिलर ठरू शकतात तुमच्यासाठी उत्तम पर्याय

दैनिक गोमंतक
शनिवार, 10 एप्रिल 2021

भारतीय मोटरसायकल बाजाराच्या 180 सीसी प्रकारात जास्त स्पर्धा नाही. म्हणजेच जर ग्राहकांना 180 सीसीची बाइक खरेदी करायची असेल तर त्यांच्याकडे मर्यादित पर्याय आहेत.

भारतीय मोटरसायकल बाजाराच्या 180 सीसी प्रकारात जास्त स्पर्धा नाही. म्हणजेच जर ग्राहकांना 180 सीसीची बाइक खरेदी करायची असेल तर त्यांच्याकडे मर्यादित पर्याय आहेत. 180  सीसी बाईक मध्ये उपलब्ध असलेले पर्याय आणि त्यांच्या वैशष्ट्यांबद्दल जाणून घेऊ. (Best 180 CC Two Wheelers with Style)

बजाजने अलीकडेच अद्ययावत इंजिनसह ही बाईक बाजारात आणली आहे. मजबूत इंजिनसह बाईकचा लुकही खूप चांगला असल्याचे पाहायला मिळते आहे.  या बाईकची प्रारंभिक किंमत 1,07,904 रुपये आहे (एक्स-शोरूम, दिल्ली). काळा-लाल या एकाच रंगात ही बाईक सध्या उपलब्ध आहे. मस्क्युलर फ्युएल टॅंक, स्प्लिट सीट, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि सिंगल पॉड हेडलाईटसह दुचाकीला दुहेरी वेळ चालणारे दिवे (डीआरएल) मिळतात. यात सिंगल सिलिंडर, एअर कूल्ड इंजिन आहे  जे 178.6 सीसी, 16.7 बीएचपी आणि 14.52 एनएमची टॉर्क जनरेट करते.

Share Market Update : कोरोनाच्या धास्तीने सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले

स्टाईलिश बाईक पसंत करणार्‍या तरुणांना टीव्हीएसची आपाचे आरटीआर (TVS Apache RTR) ही बाईक उत्तम पर्याय आहे. 180 सीसी प्रकारच्या बाइकमध्ये अपाचे आरटीआर 180 ही सुद्धा एक उत्तमी निवड असू शकते. विशेषतः त्यात एलईडी लाईट्स, इंधन टाकीवरील स्पीड लाइन ग्राफिक्स, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरसह हेडलॅम्प्स आहेत. बाईक पांढर्‍या, निळ्या, काळा आणि राखाडी अशा चार रंगात उपलब्ध आहे. यात 177.4 सीसीचा सिंगल सिलिंडर, फ्युएल इंजेक्टेड इंजिन आहे, जे  16.79 बीएचपी पॉवर आणि 15.5 एमएम टॉर्क जनरेट करते.  सध्या या गाडीची (एक्स-शोरूम, दिल्ली). किंमत 1,08,270 रुपये आहे. 

होंडा हॉर्नेट (Honda Hornet) 2.0 ही बाईक दोन डिझाईन मध्ये बाजारात आली असून, त्याची प्रारंभिक किंमत 1,28,195 (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. तसेच सध्या ही गाडी चार रंगात उपलब्ध आहे. या दुचाकीला एलईडी हेडलॅम्प्स, मस्क्युलार डिझाइन, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि सिंगल चॅनेल एबीएस या दोन्ही टायर्सला डिस्क ब्रेकी मिळणार आहेत. विशेष गोष्ट अशी आहे की इंडिकेटर्स आणि टेल लॅम्प देखील पूर्णपणे एलईडी आहेत. यात 184.4 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे, जे 17 एचपी पॉवर आणि 16.1Nm टॉर्क जनरेट करते.

संबंधित बातम्या