५०० रूपयांपेक्षा कमी खर्चातील मोबाईल प्रीपेड प्लॅन शोधताय? मग हे वाचा...

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

मोबाईलवर खर्च करण्यासाठी तुमचा महिन्याचा बजेट ५०० रूपयांपेक्षा कमी असेल. मात्र, तुम्हाला त्यातही अमलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएस असलेला  प्रीपेड पॅक येत असेल अशा रिचार्ज पॅकच्याबाबत तुम्हाला माहिती असावीच...    

एअरटेल, जियो, वोडाफोन, आयडिया आणि बीएसएनएल अशा कंपन्यांजवळ अनेक अनलिमिटेड डेटा आणि वॉईस बेनिफिट्सचे प्लॅन्स आहेत. ग्राहकांना आपल्या गरजेनुसार  प्लॅन निवडणे मात्र मुश्कील झाले आहे. आज तुमची ही अडचण सोडवून ५०० रूपयांपेक्षा कमी आणि उत्तम अनलिमिटेड बेनिफिटच्या प्रीपेड प्लॅन्सबाबत या लेखात जाणून घेणार आहोत.   

२४७ रूपयांचा बीएसएनएल 'एसटीव्ही' प्लॅन- 

५०० रूपयांपेक्षा कमी पैश्यात येणारा एसटीव्ही २४७ हा प्लॅन बीएसएनएलच्य बेस्ट अनलिमिटेड प्रीपेड प्लॅनमध्ये समाविष्ट आहे. या प्लॅनमध्ये ३ GB(FUP) डेटा मिळणार आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग( प्रतिदिवस २५० मिनिटे) आणि १०० एसएमएसही या प्लॅनमध्ये समाविष्ट आहेत. FUP डेटा संपल्यावर स्पीड कमी होऊन ८० केबीपीए इतका होतो. याशिवाय वापरकर्त्यांना इरोस नाऊ आणि बीएसएनएल ट्यून्सचेही मोफत सबस्क्रीप्शन मिळते. हा पॅक ४० दिवसांपर्यंत चालतो.     

४४९ रूपयांचा एअरटेल प्लॅन-

बीएसएनएलनंतर एअरटेलचा ४४९ रूपयांच्या प्लॅनचा क्रमांक लागतो. यात रोज २ GB हायस्पीड डेटा ऑफर केला जातो. याशिवाय देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंग फ्री आहे. ग्राहक रोज १०० एसएमएसही पाठवू शकतात. हा पॅक ५६ दिवसांच्या काळात वापरता येऊ शकतो. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये एअरटेल एक्ट्रीम प्रीमियम आणि एक वर्षापर्यंत शॉ अकादमी, विंक म्यूझिक आदींचे सबस्क्रीप्शन मोफत देण्यात येते.  

 ४४४ रूपयांचा जियो प्रीपेड प्लॅन- 

जियोच्या ४४४ रूपयांचा उत्तम अनलिमिटेड प्रीपेड प्लॅन ५६ दिवसांपर्यंत वापरता येतो. या प्लॅनमध्ये प्रत्येक दिवशी २GB डेटा देण्यात येतो. प्रत्येक दिवशी मिळणारा डेटा संपल्यावर ६४ एमबीपीएस स्पीडनुसार डेटा वापरता येतो.  यातही तुम्ही १०० एसएमएस मोफत मिळवू शकतात. जियो अॅप्सचे सबस्क्रीप्शनही तुम्ही या रिचार्जमध्ये वापरू शकता. 

४४९ रूपयांचा व्हीआय प्लॅन- 

४४९ रूपयांचा व्हीआय अनलिमिटेड प्रीपेड प्लॅन मध्ये डबल डेटाची ऑफर देण्यात येते. म्हणजे ग्राहक प्रत्येक दिवशी ४GB डेटा उपभोगू शकता.  या प्लॅनमध्ये कॉलिंग फ्री असून प्रत्येक दिवशी १०० एसएमएससुद्धा मिळतात. वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये 'वीकेंड डेटा रोलओव्हर'ची सुविधाही देण्यात येते.

संबंधित बातम्या