Beware: एसबीआयकडून ग्राहकांना मोठी चेतावणी

पूर्वीच्या तुलनेत आता डिजिटल (Digital) माध्यमातून फसवणूक (Fraud) खूप वाढली आहे.
Beware: एसबीआयकडून ग्राहकांना मोठी चेतावणी
Beware: एसबीआयकडून ग्राहकांसाठी मोठी चेतावणी Dainik Gomantak

देशात कोरोना महामारीमुळे ज्या क्षेत्रात सर्वात जास्त बदल झाला असेल तर तो बँकिंग क्षेत्रात झाला आहे. बँक (Bank) आणि त्यांच्याशी संबंधित बरीच कामे घरबसल्या ऑनलाइन करता येणार आहेत. ग्राहकांना (Customer) बँकमध्ये येण्याचे अधिक काम पडू नये याची काळजी बँका घेत आहेत. पण यामुळे अधिक अडचण निर्माण केली आहे. पूर्वीच्या तुलनेत आता डिजिटल (Digital) माध्यमातून फसवणूक (Fraud) खूप वाढली आहे. म्हणजेच तुमची एक चूक आणि खाते संपूर्ण रिकामे होऊ शकते. हे लक्षात घेवून स्टेट बँक ऑफ इंडिया ने ग्राहकांना बनावट ग्राहक सेवा क्रमांकाबद्दल सतर्क केले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर व्हिडिओ (Video) शेअर केला आहे. ज्यामध्ये बँकने ग्राहकांना बनावट ग्राहक क्रमांकापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ति चुकीने बनावट ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करते. ज्यामध्ये तो कार लॉनबाबत माहिती विचारतो दुसऱ्या बाजूने खात्याचे तपशील विचारले जातात. ग्राहकाने खात्याचा तपशील दिल्यावर तुमचे खाते बंद झाल्याची माहिती मिळते. तुमचा डेबिट कार्ड क्रमांक शेअर करा आणि अशाप्रकारे सर्व माहिती घेवून फसवणूक करून खात्यातील सर्व पैसे काढून घेतेल जातात. यामुळे तुमच्या खात्या संबंधित माहिती कुणालाही देवू नये, असे बँकेच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आले आहे, तसेच बँकने आपला ग्राहक क्रमांकही जाहीर केला आहे.

Beware: एसबीआयकडून ग्राहकांसाठी मोठी चेतावणी
Credit Card Statement तपासणे का महत्त्वाचे ते जाणून घ्या

SBIचा कस्टमर केअर नंबर कोणता?

जर तुम्हाला कस्टमर केअर नंबर हवा असेल तर तुम्ही SBIच्या अधिकृत वेबसाइटवर जावून तिथे दिलेला नंबर वापरू शकता. याशिवाय तुमच्यासोबत काही फ्रॉड झाला असेल तर तुम्ही तात्काल सायबर क्राइम हेल्पलाइन क्रमांक 155260 वर कॉल करू शकता. या नंबरवर तुम्ही तक्रार नोंदवू शकता. बँकने ट्वीटरवर आपली माहिती देत ग्राहक क्रमांक शेअर केला आहे. 1800112211, 18004253800, 08026599990 या क्रमांकावर कॉल करून कोणीही माहिती मिळवू शकतो.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com