SBI-HDFC-ICICI च्या ग्राहकांसाठी अर्थमंत्र्यांनी दिला 'हा' आदेश, तुम्हीही म्हणाल...
Kisan Credit Card: अनेकवेळा बँक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांशी गैरवर्तन केल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्याची तक्रारही वरिष्ठांकडे केली जाते. हे लक्षात घेऊन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत के कराड यांनी बँक कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे.
बँकिंग सेवेत आणखी सुधारणा करण्याचे आवाहन करुन ते म्हणाले की, बँकांनी ग्राहकांना देव मानून काम करावे. यापूर्वी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही बँक प्रमुखांसोबतच्या बैठकीत बँकिंग प्रणाली सुलभ करण्यास सांगितले होते.
समस्या कमी करण्यासाठी हे करा
बँक ऑफ महाराष्ट्र (BoM) ने या आठवड्यात आयोजित केलेल्या 'ग्राहक परिषद' कार्यक्रमाला संबोधित करताना कराड म्हणाले की, बँकांनी त्यांच्या ग्राहक सेवा सुधारल्या पाहिजेत. यासोबतच समस्यांचे मुद्दे कमी करण्याच्या दिशेनेही प्रगती व्हायला हवी.
बँकांची आर्थिक स्थिती चांगली राहावी, यासाठी ग्राहकांनी (Customers) कर्ज फेडण्यासाठी मदत करावी, असेही ते यावेळी म्हणाले.
योजना शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचे आवाहन
किसान क्रेडिट कार्ड (KCC) बाबत, त्यांनी BoM सह सर्व बँकांना ही योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, बँकिंग क्षेत्राने लहान आणि अल्पभूधारक शेतकरी, तरुण आणि महिला उद्योजकांना मदत करावी.
तसेच, देशातील सर्वाधिक ग्राहक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), ICICI बँक, HDFC बँक (HDFC Bank) आणि पंजाब नॅशनल बँक आहेत. अशा परिस्थितीत अर्थमंत्र्यांच्या आदेशाचा फायदा या बँकांच्या ग्राहकांना मिळणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.