रिलायन्स इंडस्ट्रीजची मोठी घोषणा ऑईल-टु-केमिकल्स या नव्या कंपनीचे अनावरण

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) ने ऑईल-टु-केमिकल्स व्यवसायात संपूर्णपणे मालकीची कंपनी असलेल्या डिमर्जर फ्रेमवर्कची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी कंपनी आणि मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) ने ऑईल-टु-केमिकल्स व्यवसायात संपूर्णपणे मालकीची कंपनी असलेल्या डिमर्जर फ्रेमवर्कची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने भागधारक आणि सावकारांकडून मान्यता मागितली आहे. येत्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला यासाठी मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे.

असा होणार कंपनीला फायदा

मुकेश अंबानी यांच्या या निर्णयाने सौदी अरामको सारख्या जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी या कंपनीची मदत होणार आहे. ऑईल-टु-केमिकल्सच्या व्यवसायाच्या पुनर्रचनेमुळे ओटुसी वैल्यू शृंखलेमधील संधींचा फायदा घेता येईल. रिलायन्स इंडस्ट्रीज ऑईल-टु-केमिकल्सच्या व्यवसायासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करीत आहे. या हालचालीमुळे धोरणात्मक भागीदारांसह वाढीच्या संधींचा पाठपुरावा करण्यात मदत होईल. अशी माहिती माहितीत कंपनीने दिली आहे.

रिलायन्स स्टॉकमध्ये जोरदार वाढ झाली

या घोषणेनंतर रिलायन्स स्टॉकमध्ये जोरदार वाढ होत आहे. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 13.40 लाख कोटी रुपये आहे. म्हणजेच, बाजारातील भांडवलाच्या बाबतीत ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.  

मुकेश अंबानी भारतात बनवणार जगातलं सर्वात मोठ प्राणी संग्रहालय

जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीशी वाटाघाटी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड जगातील सर्वात मोठी तेल कंपनी सौदी अरामकोशी 20 टक्के भागभांडवल विक्रीसाठी चर्चा करीत होती. परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे हा करार थांबविण्यात आला होता. कंपनीच्या तेल ते रसायनांच्या व्यवसायाचे मूल्य 75 अब्ज होते. 15 जुलै 2020 रोजी झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 43 व्या एजीएम मध्ये अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी महत्वपूर्ण वक्तव्. केले होते. "साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे सौदी अरामकोबरोबर प्रस्तावित करार वेळेत पूर्ण झाला नाही. परंतु आम्ही सौदी अरामकोशी असलेल्या व्यावसायिक संबंधांचा आदर करतो आणि त्यासह दीर्घकालीन भागीदारीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत," असे मुकेश अंबानी म्हणाले होते.

 

 

 

संबंधित बातम्या