रिलायन्सच्या ग्राहक संख्येत मोठी घट 

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

ट्रायने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार रिलायन्सच्य़ा ग्राहक संख्येत मोठी घट झाली असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. सरकार आणि शेतकरी संघंटना यांच्य़ात कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठी अनेक चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या मात्र अद्याप तरी कोणत्याही प्रकारचा तोडगा निघू शकलेला नाही. केंद्र सरकार देशातील ठराविक उद्योजकांसाठी कायदे करत आहे असा आरोपही शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान अनेक वेळा केले आहेत. तसेच देशभरातील नागरिकांना रिलायन्सच्या वस्तू आणि सेवांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन देखील शेतकरी संघंटनांनी केले आहे. आणि याचच परिणाम दिसून आला आहे. ट्रायने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार रिलायन्सच्य़ा ग्राहक संख्येत मोठी घट झाली असल्याचे समोर आले आहे.

देशात दूरसंचार क्षेत्रात अग्रेसर असणारी रिलायन्स जिओ कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. हरियाणामध्ये रिलायन्सच्या ग्राहक संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ट्रायकडून डिसेंबर 2020 चा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालानुसार हरियाणा आणि पंजाबमधील रिलायन्सच्या ग्राहक संख्येत मोठी घट झाली आहे. डिसेंबर 2020 मध्ये कंपनीचे ग्राहक संख्या 1.40  कोटी होती ती घटून आता 1.25 कोटी पर्यंत घटली आहे.

"भाजपला तृणमूलची बी-टीम व्हायचं नाही"; ममता दिदींच्या चिंतेत वाढ

हरियाणामध्ये रिलायन्सची ग्राहक संख्या 94.48 लाख होती आता ती घटून 89.7 लाख इतकी झाली आहे. 2016 मध्ये जिओ या दूरसंचार सेवेची सुरुवात झाल्यानंतर हरियाणामध्ये पहिल्य़ांदाच एवढ्या मोठ्या ग्राहक संख्येत घट झाली आहे.असं रिलायन्सकडून निवेदनाद्वारे जाहीर केले होते. त्याचबरोबर रिलायन्सने ग्राहक संख्येत झालेल्या घटीबद्द्लही स्पष्टीकरण दिलं होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाली होती. त्याचबरोबर कृषी कायद्यांचा विरोध सुरु असताना ठराविक भौगोलिक प्रदेशात जिओच्या विरोधात दुषप्रचार करण्यात येत आहे. असंही निवेदनात म्हटले आहे.   

संबंधित बातम्या