Bank Privatisation: 7 जानेवारीला आणखी एक बँक होणार प्राइव्हेट, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!

Bank Privatisation News: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत माहिती दिली आहे. सरकारने IDBI बँकेच्या (IDBI bank privatization news) खाजगीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanDainik Gomantak

Bank Privatisation Update: बँकांच्या खाजगीकरणाबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकार बँकांच्या खाजगीकरणाचा विचार करत असून अनेक बँकांमधील हिस्सेदारी विकण्याची योजना आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत माहिती दिली आहे. सरकारने IDBI बँकेच्या (IDBI bank privatization news) खाजगीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

निविदांना 7 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली

केंद्र सरकारने (Central Government) IDBI बँकेच्या खाजगीकरणासाठी प्रारंभिक निविदा भरण्याची अंतिम मुदत 7 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. सरकार आणि LIC यांना IDBI बँकेतील 60.72 टक्के हिस्सा विकायचा आहे. यासाठी आयडीबीआय बँकेने ऑक्टोबरमध्ये संभाव्य खरेदीदारांकडून निविदा मागवल्या होत्या.

Nirmala Sitharaman
Bank Privatisation: सरकारी बँका झपाट्याने होतायेत Private! अर्थमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

सूचनामध्ये दिलेली माहिती

व्यवहार सल्लागारांना कालमर्यादा वाढवण्याच्या काही विनंत्या मिळाल्या होत्या, ज्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अ‍ॅसेट मॅनेजमेंट (DIPAM) ने एका नोटीसमध्ये म्हटले आहे की, आता EoI सादर करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2022 ते 7 जानेवारी 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. EOI चे पत्र जमा करण्याची अंतिम तारीख देखील 23 डिसेंबर ते 14 जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Nirmala Sitharaman
IDBI Bank Privatisation: आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा

खरेदीच्या शर्यतीत कोण आहे?

कार्लाइल ग्रुप, फेअरफॅक्स फायनान्शिअल होल्डिंग्ज आणि डीसीबी बँक ही बँक खरेदी करण्यात खूप रस दाखवत आहेत. या वृत्ताच्या दरम्यान बुधवारी बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण IDBI बँकेतील (IDBI Bank) सुमारे 10 टक्के हिस्सेदारीसाठी बोली लावू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com