Budget 2023: अर्थमंत्र्यांची रेल्वेसाठी मोठी घोषणा,2013 च्या तुलनेत केली 9 पटींनी वाढ

Budget 2023: पायाभूत सुविधांसाठी निधी , शेतकऱ्यांसाठी निधीची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. यासोबतच रेल्वेसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. 2023-24च्या अर्थसंकल्पात 2013 च्या 9 पट वाढ झाल्याचे म्हटले आहे.
Budget 2023
Budget 2023Dainik Gomantak

Budget 2023: भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आज अर्थसंकल्प प्रस्तुत केले. यामध्ये इनकम टॅक्स मध्ये मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. आयकराची रचना बदलण्यात आली आहे.

पायाभूत सुविधांसाठी निधी , शेतकऱ्यांसाठी निधीची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. यासोबतच रेल्वेसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. 2023-24च्या अर्थसंकल्पात 2013 च्या 9 पट वाढ झाल्याचे म्हटले आहे.

2 लाख 40 हजार कोटी निधीची रेल्वेसाठी तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे( Railway)मध्ये डिजिटल तिकिट प्रणालीचा अवलंब करण्यावर भर देणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे.

Budget 2023
Union Budget 2023: पीएम आवास योजनेबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा, अर्थमंत्री म्हणाल्या...!

याबरोबरच, रेल्वेमध्ये 100 नवीन योजना करणारअसल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. या नवीन योजनांसाठी 75 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. या योजना राबविण्यासाठी खाजगी क्षेत्राची मदत घेतल्याचे म्हटले आहे.

रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी तरतूदी करण्यासोबतच रेल्वेच्या नवीन मार्ग आणि नव्या प्रकल्पांना गती देणार असल्याचेदेखील अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्या अर्थसंल्पीय भाषणात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com