बिटकॉईनच्या किंमतीने बाजारात घातला धुमाकूळ

बिटकॉईनच्या किंमतीने बाजारात घातला धुमाकूळ
Bitcoin prices hit the market

मागील काही दिवसांपासून बिटकॉईनने (Bitcoin) बाजारात आपल्या किंमतींबाबत (prices) धुमाकूळ घातला आहे. बाजारात तेजी आणि मंदीच्या काळात जगाचे लक्ष हे बिटकॉईनवर अधिक असते ही गोष्टही आता उघड झाली आहे. अशातच 19 जून रविवारी (Sunday 19 June) बिटकॉईनने किंमतीच्या बाबतीत 9.8% वाढ नोंदवत बिटकॉईन आता 39,035.47 डॉलरवर पोहचला आहे. (Bitcoin prices hit the market)

बिटकॉईन सध्या जगातील सर्वात मोठी आणि सर्वात प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी म्हणून समोर अली आहे. कारण, मागील काही दिवसांत बिटकॉईन किंमतीच्या बाबतीत नवनवीन उच्चंक गाठताना दिसत आहे. याच कारण असे की, 4 जानेवारीला बिटकॉईनची किंमत 27,734 डॉलर इतकी होती. तर 19 जूनला ती 39,035.47 डॉलरवर पोहचली आहे. म्हणजेच या वर्षाच्या तुलनेत 40.7% इतकी वाढली आहे.

तर दुसरीकडे इथर, ब्लॉकचेन या आणि अन्य नेटवर्कशी जोडलेले नाणे 19 जूनला 7 टक्क्यांनी वधारून 2,532.77 डॉलरवर पोहोचले असून, या नवीन किंमतीची भर यात पडली आहे.

दरम्यान, टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क यांनी रविवारी ट्विट करत असे सांगितले की, " इलेक्ट्रिक कार उत्पादित करणाऱ्या कंपन्या जेंव्हा त्यांचे व्यवहार करण्यासाठी बिटकॉईनचा वापर करतील तेव्हा मी बिटकॉइन व्यवहारास अनुमती देण्यास पुन्हा सुरूवात करेन."

टेस्ला कार खरेदी करण्यासाठी मोबदला देताना क्रिप्टोकरन्सीजचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र ऊर्जेचा अधिक वापर होत असल्यामुळे  या योजनेला स्थगिती देण्यात अली आहे. एकूणच या सगळ्या गोष्टींमुळे  क्रिप्टोकरन्सीजच्या किंमती मध्ये भविष्यात मोठ्या प्रमाणात फरक पडू शकतो हे ही नक्की आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com