Share Market 'ब्लॅक फ्रायडे'... अवघ्या दोन तासात 7 लाख कोटींचा फटका, सेन्सेक्स 1300 अंकांनी घसरला

सेन्सेक्स आज सुमारे 1,300 अंकांनी घसरला आहे. सेन्सेक्स सध्या 57,472 वर आहे. तर निफ्टी सध्या 17,130 अंकांच्या जवळ आहे.
Black Friday In share market Sensex on historic down
Black Friday In share market Sensex on historic down Dainik Gomantak

भारतीय शेअर बाजारात (Share Market) आजचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरत आहे कारण आज शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) मध्ये मोठया प्रमाणात घसरण दिसत आहे. आज सेन्सेक्स जवळपास 1300 आणि निफ्टी 400 अंकांनि घसरला आहे. बाजारातील या घसरणीमुळे केवळ दोन तासांच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांचे 7 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये (BSE) सूचीबद्ध शेअर्सचे बाजार भांडवल सुमारे 6 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 259.71 लाख कोटींवर आले आहे.(Black Friday In share market Sensex on historic down)

सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही अडीच टक्क्यांनी घसरले असून त्यामागचे मुख्य कारण जागतिक आहे.सध्या दक्षिण आफ्रिकेत कोरोनाव्हायरसचा एक नवीन प्रकार समोर आला आहे आणि यामुळे जागतिक बाजारपेठेत घबराट निर्माण झाली आहे. या कारणास्तव, फार्मा क्षेत्र वगळता, देशांतर्गत बाजारात कोणतेही शेअर वाढीत दिसले नाहीत .

त्याचप्रमाणे, गेल्या दोन आठवड्यांपासून भारतीय शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत होती, आणि त्यातच आता कोरोनाच्या नव्या प्रकाराची बातमी आल्यानंतर बाजारात घसरण अधिकच वाढली आहे. युरोपियन युनियनने दक्षिण आफ्रिकेतून विमानांच्या आगमनावर बंदी घातली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे अनेक युरोपीय देशांमध्ये आधीच लॉकडाऊन लागू करण्यात आले आहेत.

सेन्सेक्स आज सुमारे 1,300 अंकांनी घसरला आहे. सेन्सेक्स सध्या 57,472 वर आहे. तर निफ्टी सध्या 17,130 अंकांच्या जवळ आहे. कोटक बँक आणि एचडीएफसी या दोन्ही कंपन्यांमध्ये 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. यासोबतच आजची नजर आरआयएलच्या शेअर्सवरही आहे. अरामकोसोबतचा रिलायन्सचा करार रद्द झाल्यानंतर सर्वांच्या नजरा कंपनीच्या शेअर्सकडे लागल्या आहेत.

Black Friday In share market Sensex on historic down
क्रिप्टोकरन्सी कायदेशीर होणार का?

मात्र तज्ज्ञांच्या मते, भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याची गरज नाही आणि गुंतवणूकदारांनी या विक्रीला खरेदीची संधी म्हणून पाहावे. ते म्हणाले की नवीन प्रकार भारतीय गुंतवणूकदारांना फारसा चिंतेचा विषय नसावा. जोखीम-प्रतिरोधक गुंतवणूकदारांनी बाजारात अधिक पैसे गुंतवणे सुरू केले पाहिजे जर त्यांनी यापूर्वी असे केले नसेल.भारतीय शेअर बाजाराच्या घसरणीमागे कमकुवत आशियाई बाजारांचाही हात असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डब्ल्यूएचओने त्यांना नवीन कोरोनाच्या प्रकारांबद्दल सतर्क केल्यानंतर व्यापारी चिंतेत आहेत. आयसीआरएच्या अहवालात बुडीत कर्जाबाबत बोलले गेल्याने त्यांच्यात थोडी भीती आहे. आणि श्रेणीकरणाच्या नियमांमुळे देशातील नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांची (NBFCs) नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता वाढू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com