'बुध्द तांदूळ' सिंगापूरमध्ये निर्माण करणार आपली ओळख

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

स्वाद आणि सुगंधात अतुलनीय काळा तांदूळ आता सिंगापूरमध्ये आपली ओळख निर्माण करणार आहे. भगवान बुद्धांचे नैवेद्य मानल्या जाणार्‍या 20 टन काळ्या तांदळाची पहिली टर्म मार्चमध्ये सिंगापूरला जाणार आहे. 

नवी दिल्ली: स्वाद आणि सुगंधात अतुलनीय काळा तांदूळ आता सिंगापूरमध्ये आपली ओळख निर्माण करणार आहे. भगवान बुद्धांचे नैवेद्य मानल्या जाणार्‍या 20 टन काळ्या तांदळाची पहिली टर्म मार्चमध्ये सिंगापूरला जाणार आहे. 'बुध्द तांदूळ' म्हणून ओळखले जाणारे हा तांदूळ बौद्ध देशांमध्ये भगवान बुद्धांनी भिक्षूंना दिलेला प्रसाद म्हणून दिला जात आहेत.

याच कारणामुळे या तांदळाच्या पॅकिंगवर, “या तांदळाचा विशिष्ट सुगंध लोकांना नेहमीच माझी (महात्मा बुद्धांची) आठवण करून देईल,” असे महात्मा बुद्धाचे म्हणणे लिहिले गेले आहे.  काळ्या तांदळाच्या या उपलब्धीचा फायदा केवळ सिद्धार्थनगरच नाही तर गोरखपूर, देवरिया, कुशीनगर, महाराजगंज, सिद्धार्थनगर, संतकबीरनगर, बस्ती, बहराईच, बलरामपूर, गोंडा आणि श्रावस्ती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

काळा तांदूळ ओडीओपी म्हणून घोषित

काळ्या तांदळाचे उत्पादन वाढविण्यासाठी त्याचबरोबर त्याच्या प्रक्रिया, पॅकेजिंग आणि ब्रँडिंगचे उत्पादन वाढविण्यासाठी राज्य सरकारने काळ्या तांदळाला सिद्धार्थनगरचा ओडीओपी म्हणून घोषित केले आहे. क्लस्टर पध्दतीचा अवलंब करीत, केंद्र सरकारने सामान्य कृषी-हवामान क्षेत्राच्या आधारे बस्ती, गोरखपूर, महाराजगंज, सिद्धार्थनगर आणि संतकबीरनगर येथे काळा तांदूळ ओडीओपी म्हणून घोषित केला आहे. अशा परिस्थितीत कोरिया, चीन, जपान, म्यानमार, कंबोडिया, मंगोलिया, व्हिएतनाम, थायलंड, श्रीलंका आणि भूतान पर्यंत दक्षिणपूर्व आशियाच्या या बौद्ध देशांमध्ये 'बुद्धाचा महाप्रसाद' म्हणून याचा प्रसार झाला तर या देशांकडून मागणी वाढेल. आणि त्या सर्व जिल्ह्यांना लागवडीस चालना मिळेल त्याचबरोबर काळ्या तांदळाला चांगल्या किंमतीत वाढेल. ज्यासाठी या पीकाला जीआय दर्जी मिळाला आहे. तांदळाचे पॅकिंग सुरू केले आहे असून मार्च अखेर काळा तांदूळ सिंगापूरला पाठविण्यात येणार अशी माहिती कृषी शास्त्रज्ञ डॉ. रामचेत चौधरी यांनी दिली आहे.

मुकेश अंबानी भारतात बनवणार जगातलं सर्वात मोठ प्राणी संग्रहालय 

बुद्धांनी भक्तांना नैवेद्य म्हणून दिली होती खी

"हे धान गौतम बुद्धांच्या काळात सिद्धार्थनगरच्या एवजी ही गावात पीकत होती. असे मानले जाते की, महात्मा बुद्धांनी हिरण्यवती किनाऱ्यावर याच तांदूळची खीर खावून आपला उपवास सोडला होता. आणि भक्तांना नैवेद्य म्हणून ही खीर दिली होती. काळ्या तांदळाचा उल्लेख चीनच्या प्रवासी फाहियानच्या प्रवासी वृत्तातही आढळतो," असे चौधरी यांनी सांगितले.

शेतकर्‍यांची आवड का वाढत आहे?

2009 पर्यंत पूर्वांचलमध्ये 200 हेक्टरवर लागवड होत होती. आता जीआय टॅग मिळाल्यानंतर 11 जिल्ह्यांमध्ये हे क्षेत्र 45000 हेक्टरपेक्षा जास्त झाले आहे. सिद्धार्थनगरमध्ये सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र आहे. या पीकाची लागवल झाल्यानंतर उत्पादन वाढले आणि शेतकऱ्यांना नफा मिळू  लागला म्हणून या भागात काळ्या तांदळाच्या लागवडीचे क्षेत्र वाढू लागले.

सध्या ते क्षेत्र 1 लाख हेक्टरवर नेण्याचे लक्ष्य आहे. या तांदळाची किंमत बासमतीपेक्षा जास्त आहे. म्हणूनच शेतकऱ्यांनी त्याची लागवड सुरू करुन नफा कमवावा. पूर्वांचलमधील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे हे एक मोठे शस्त्र बनू शकते. या क्षेत्राचे स्वतःचे उत्पादन काळा तांदूळ आहे. अशी माहिती कृषी शास्त्रज्ञ डॉ. रामचेत चौधरी यांनी दिली आहे.

 

संबंधित बातम्या