बीएमडब्ल्यूकडून डॉक्टरांसाठी ऑईल सेवा

Dainik Gomantak
सोमवार, 11 मे 2020

डॉक्‍टर्स लोकांच्‍या आरोग्‍याच्‍या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस निरंतरपणे काम करत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील आमच्‍या सहयोगींच्‍या नि:स्‍वार्थ बलिदानासाठी पूरक इंजिन ऑईल सर्विस ही बीएमडब्ल्यू आणि डीलर भागीदारांकडून एक कौतुकाची थाप आहे.

मुंबई

बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाने बीएमडब्ल्यू किंवा मिनी किंवा बीएमडब्ल्यू मोटोर्राड बाइकचे मालक असलेल्‍या आणि अनपेक्षित कोविड १९ महामारीविरोधात लढ्यामध्‍ये रात्रंदिवस नि:स्‍वार्थपणे काम करत असलेल्‍या डॉक्‍टरांसाठी खास विक्रीपश्‍चात्त सेवा उपक्रमाची घोषणा केली आहे. कौतुकाची थाप म्‍हणून बीएमडब्ल्यू ग्रुप इंडिया आपल्‍या डीलर भागीदारांसोबत सहयोगाने देशभरातील त्‍यांच्‍या डिलरशिप सर्विस केंद्रांमध्‍ये पूरक इंजिन ऑईल सर्विस देणार आहे.
बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अॅक्टिंग प्रेसिडण्‍ट मि. अरलिंदो टेक्‍सीएरा म्‍हणाले, ;या महिन्‍याच्‍या सुरूवातीला बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाने त्‍यांच्‍या विविध सामाजिक जबाबदारी उपक्रमांच्‍या माध्‍यमातून कोविड १९ विरोधातील लढ्यासाठी योगदान देण्‍याचे वचन घेतले. त्‍याअनुषंगाने कंपनीने दिल्‍ली , चेन्‍नईमधील वैद्यकीय सुविधांसाठी महत्त्वाचे केअर इक्विपमेंट व सेवा दिल्‍या आहेत. डॉक्‍टर्स लोकांच्‍या आरोग्‍याच्‍या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस निरंतरपणे काम करत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील आमच्‍या सहयोगींच्‍या नि:स्‍वार्थ बलिदानासाठी पूरक इंजिन ऑईल सर्विस ही आमच्‍याकडून आणि आमच्‍या डीलर भागीदारांकडून एक कौतुकाची थाप आहे. या आव्‍हानात्‍मक काळामध्‍ये त्‍यांच्‍या बीएमडब्ल्यू व मिनी कार्स आणि बीएमडब्ल्यू मोटोर्राड बाइक्‍सची काळजी घेणे हे आमच्‍यासाठी आणि आमच्‍या डीलर भागीदारांसाठी आनंददायी आहे.
बीएमडब्ल्यू किंवा मिनी किंवाबीएमडब्ल्यू मोटोर्राड वाहनांचे मालक असलेले इंडियन मेडिकल असोसिएशन, हॉस्पिटल्‍स व क्लिनिक्‍स असलेले नोंदणीकृत डॉक्‍टर्स या सेवेचा लाभ घेण्‍यासाठी www.bmw-contactless.in येथे नोंदणी करू शकतात.
कंडिशन बेस्‍ड सर्विस (CBS) नुसार इंजिन ऑईल सर्विस अपेक्षित असलेली वाहने लॉकडाऊन कालावधी संपल्‍यानंतर ९० दिवसांमध्‍ये पूरक सेवेचा लाभ घेण्‍यास पात्र ठरतील. विद्यमान बीएमडब्ल्यू किंवा मिनी सर्विस इन्‍क्‍लुसिव्‍ह पॅकेज किंवा
वॉरण्‍टी एक्‍स्‍टेंशन धारकांना इंजिन ऑईल सर्विसच्‍या ऐवजी कारचे मोफत सॅनिटायझेशन ऑफर करण्‍यात येईल. 

संबंधित बातम्या