Paytm LPG Offer: पेटीएमवरून बुकिंग केल्यास मिळेल मोफत एलपीजी सिलिंडर!

या ऑफरमध्ये नव्या युजर्सना त्यांच्या पहिल्या बुकिंगवर 30 रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक मिळू शकतो.
paytm cylinder booking
paytm cylinder bookingDainik Gomantak

पेटीएमने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी एक नविन योजना आणली आहे. वन97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या मालकीच्या पेटीएमने आपल्या प्लॅटफॉर्मवरून एलपीजी सिलिंडर बुक केलेल्या नवीन वापरकर्त्यांसाठी एक घोषणा केली आहे. सध्या लाखो वापरकर्ते पेटीएमचा (paytm) वापर एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी सोयीस्करपणे करत आहेत. सध्या भारत गॅसचं बुकिंग खास पेटीएम अॅपवर उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया की पेटीएम वेळोवेळी अशा ऑफर काढत असते. ही ऑफर लागू करताना कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी सर्व नियम आणि अटी समजून घेणं गरजेचं आहे.

paytm cylinder booking
BOIची वन टाइम सेटलमेंट स्कीम होणार उद्यापासून सुरू

‘FREEGAS’ या कूपन कोडचा वापर

याशिवाय पेटीएमच्या विद्यमान युजर्सना मोफत एलपीजी सिलिंडर मोफत (FREE LPG CYLINDER मिळण्याची संधी आहे. त्यासाठी पेटीएम अॅपवर पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी त्यांना 'फ्रीगॅस' हा कूपन कोड वापरावा लागणार आहे. कंपनीने अलीकडेच इन्व्हेस्टिगेटिव्ह फीचर्स जोडून सिलिंडर (Gas Cylinder) बुकिंगचा अनुभव सुधारला आहे, ज्यामुळे युजर्सना त्यांच्या गॅस सिलेंडरच्या बुकिंगचा मागोवा घेता येईल आणि रिफिलसाठी ऑटोमेटेड इंटेलिजंट रिमाइंडर्स मिळू शकतील.

FIRSTCYLINDER प्रोमोकोड अद्ययावत करणे आवश्यक

पेटीएमनुसार, या ऑफरमध्ये नव्या युजर्सना त्यांच्या पहिल्या बुकिंगवर 30 रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक मिळू शकतो. यासाठी पेटीएम अॅपवर पेमेंट पूर्ण करताना त्यांना "FIRSTCYLINDER" हा प्रोमोकोड लावावा लागेल. ही कॅशबॅक ऑफर इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅस या सर्व 3 प्रमुख एलपीजी कंपन्यांच्या सिलेंडर बुकिंगवर लागू आहे. युजर्स 'पेटीएम नाऊ पे लेटर' प्रोग्राम पेटीएम पोस्टपॅडमध्ये नावनोंदणी करू शकतात आणि पुढील महिन्यातही सिलेंडर बुकिंगसाठी पैसे देऊ शकतात.

असे करा बुकिंग

यूजरला फक्त 'बुक गॅस सिलिंडर' (Book Gas Cylinder) टॅबवर जावे लागेल.

गॅस प्रोवाइडरची निवड करावी.

नंतर मोबाइल क्रमांक/एलपीजी आयडी/ग्राहक क्रमांक टाकावा.

पेमेंटसाठी आपल्याला पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड्स आणि नेट बँकिंग यातिल शक्य होईल त्या मार्गाने पैसे द्या.

सर्वात जवळील गॅस एजन्सी नोंदणीकृत पत्त्यावर सिलिंडर वितरीत करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com