देशातील भांडवली बाजारात आज व्यापाराच्या वेळेस तांत्रिक बिघाड झाला होता. आणि त्यामुळे मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील व्यापाराची वेळ वाढविण्यात आली. आज सकाळी एनएसईमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे 11:40 च्या वेळेस फ्यूचर अँड ऑप्शन मार्केट सहित सर्व सेगमेंट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. टेलिकॉम लिंकमधील तांत्रिक अडचणींमुळे एनएसई यंत्रणेवर परिणाम झाला असल्याचे स्टॉक एक्सचेंजने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर बाजार बंद होण्याच्या सामान्य वेळेच्या काही आधी एनएसई एक्सचेंजच्या नवीन वेबसाइटवर व्यापार पुन्हा सुरु केला.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार? जीएसटीत समावेश झाल्यास मिळणार दिलासा
एनएसई इंडियाने सोशल मीडियावरील ट्विटरवर याबाबतची माहिती दिली. या ट्विट मध्ये एनएसई इंडियाने फ्युचर अँड ऑप्शन्स सेगमेंट मध्ये व्यापार पुन्हा 3:45 ला उघडल्याचे सांगितले. व तसेच व्यापार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याचे एनएसईने आपल्या ट्विट मध्ये नमूद केले. त्याच वेळी, कॉल ऑक्शन इलिक्विड सेशनचा वेळ संध्याकाळी 4 वाजता ठेवण्यात आला. व यामध्ये पोस्ट क्लोजची वेळ 5 वाजून 10 मिनिटांनी करण्यात आली. आणि तो 5:30 वाजता बंद होणार असल्याची माहिती एनएसईने दिली. याव्यतिरिक्त प्री-ओपन वेळ संध्याकाळी 5:30 आणि बंद होण्याची वेळ 5:38 देण्यात आल्याचे निवेदनातून सांगण्यात आले.
एनएसईने बाजारातील व्यापाराबाबतच्या वेळेतील हा बदल फक्त 24 फेब्रुवारी 2021 साठीच असल्याचे नमूद केले आहे. त्यानंतर आज देशातील सर्वात जुन्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 2.07 टक्क्यांनी वधारून 50 हजारच्या स्तर ओलांडत 50,781.69 वर पोहचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने सुद्धा तेजी नोंदवत 14,982.00 ची पातळी गाठली. निफ्टीमध्ये आज 1.86 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे आठवड्याच्या तिसऱ्या सत्रात देशातील भांडवली बाजाराचे दोन्ही निर्देशांक हिरवे झाल्याचे पाहायला मिळाले.
रिलायन्स कॅपिटलवर कर्जाचे ओझे; अनिल अंबानींना कर्ज नाकीनव
मागील आठवड्याच्या शेवटच्या पाच सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये मोठी घसरण झाली झाली होती. तर चालू आठवड्याच्या पहिल्याच सत्रात सोमवारी भांडवली बाजाराच्या सेन्सेक्सने एक हजाराहून अधिक अशांनी आपटी नोंदवली होती. निफ्टी देखील तीनशे अंकांनी घसरला होता. मात्र त्यानंतर काल मंगळवारी दुसऱ्या सत्रात दोन्ही निर्देशांकांमध्ये किरकोळ वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. तर आज मुंबई शेअर बाजाराच्या बीएसई मध्ये 1030.28 अशांनी वाढून 50,781.69 वर बंद झाला. त्यानंतर निफ्टी मध्ये 274.20 अंकांनी तेजी नोंदवत 14,982.00 चा स्तर गाठला.
मुंबई शेअर बाजारातील ओएनजीसी, इंडसइंड बँक, लार्सन अँड टुब्रो, एसबीआय, टायटन, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, महिंद्रा बँक, बजाज ऑटो, एचसीएल टेक, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, टेक महिंद्रा आणि बजाज फायनान्सचे शेअर्स वधारले. आणि एनटीपीसी, सन फार्मा, टीसीएस, डॉक्टर रेड्डीज, पॉवरग्रिड, मारुती सुझुकी, एशियन पेंट यांच्या समभागांनी घसरण नोंदवली.