BSNL ने आणली सिनेमा प्लसची नविन ऑफर; मोजावे लागणार फक्त 129 रुपये  

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

भारतीय सरकारी कंपनी बीएसएनएलने नविन आँफर आणली आहे. कंपनीने यावेळी 'सिनेमा प्लस सर्व्हिस' आणली आहे. या सेवेअंतर्गत वापरकर्त्यांना ओटीटी अ‍ॅप्स फ्री मध्ये पाहायला मिळणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय सरकारी कंपनी बीएसएनएलने नविन आँफर आणली आहे. कंपनीने यावेळी 'सिनेमा प्लस सर्व्हिस' आणली आहे. या सेवेअंतर्गत वापरकर्त्यांना ओटीटी अ‍ॅप्स फ्री मध्ये पाहायला मिळणार आहे. यासाठी केवळ 129 रुपये द्यावे लागणार असून, या सेवेसाठी बीएसएनएलने यूपीपीटीव्ही सोबत भागीदारी केली आहे.

बीएसएनएलने यूपीपीटीव्ही सोबत भागीदारी करुन सिनेमा प्लस सेवा सुरू केली आहे. या  सर्व्हिस मध्ये ग्राहकांना सोनीलिव्ह स्पेशल, व्हूट सिलेक्ट, यूपीपी टीव्ही प्रीमियम आणि झी 5 प्रीमियम फ्री मध्ये पाहायला मिळणार आहे. एकाच सबस्क्रिप्शन सोबत विविध ओटीटी प्लॅटफॉर्मचा लाभ युझर्सला घेता येणार आहे. 

Farmers Protest : आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींच्या ट्विटवर केंद्र सरकारने दिली...

बीएसएनएलच्या सिनेमा प्लसची सदस्यता घेण्यासाठी ग्राहकांना कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल. वेबसाइटवर गेल्यावर टेलिकॉम सर्कल निवडल्यानंतर नंबर, ईमेल आयडी आणि नाव टाकावे लागणार आहे. एकदा साइन अप झाल्यावर ही सेवा पाहीजे त्या माध्यमावर उपलब्ध होईल. डेस्कटॉप आणि लॅपटॉपच्या या माध्यमावरती सुध्दा सहजपणे या सेवेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.

टेलिकॅाम क्षेत्रात खुप मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. टेलिकॅाम कंपन्या जास्त प्रमाणात युझर्स वाढवण्यासाठी भर देत आहेत. ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर देवुन आकर्षीत करत आहेत. त्यामुळेच बीएसएनएलने देखील ही नविन आफर आणली आहे. व या ऑफरमुळे बीएसएनएलने सगळ्याच ग्राहकांचे लक्ष वेधुन घेतले आहे.

संबंधित बातम्या