Budget 2023: अर्थसंकल्पापूर्वीच मोदी सरकारसाठी आनंदाची बातमी, करदात्यांनाही होणार फायदा

Direct Tax Collection: अर्थसंकल्पापूर्वी कर संकलनाच्या बाबतीत सरकार आणि करदाते दोघांसाठीही आनंदाची बातमी आहे.
Finance Minister Nirmala Sitharaman
Finance Minister Nirmala Sitharaman Twitter

Direct Tax Collection: अर्थसंकल्पापूर्वी कर संकलनाच्या बाबतीत सरकार आणि करदाते दोघांसाठीही आनंदाची बातमी आहे. चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात सुमारे 25 टक्के वाढ झाली आहे. 10 जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, कर संकलन 24.58 टक्क्यांनी वाढून 14.71 लाख कोटी रुपये झाले आहे. परताव्यानंतर निव्वळ कर संकलन 12.31 लाख कोटी रुपये झाले. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीपेक्षा हे प्रमाण 19.55 टक्क्यांनी अधिक आहे.

एकूण अंदाजपत्रकाच्या 86.68% कर संकलन

करवसुलीतील या वाढीचा फायदा करदात्यांना अर्थसंकल्पात (Budget) आयकर सवलतीच्या स्वरुपात मिळू शकतो. चालू आर्थिक वर्षाच्या एकूण अंदाजपत्रकाच्या 86.68 टक्के कर संकलन आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात 14.20 लाख कोटी रुपये कर संकलनाचा अंदाज होता. एकूण आधारावर, कॉर्पोरेट आयकर (सीआयटी) संकलन 19.72 टक्क्यांनी वाढले, तर वैयक्तिक आयकर (पीआयटी) 30.46 टक्क्यांनी वाढले.

Finance Minister Nirmala Sitharaman
Budget 2023 मध्ये अर्थमंत्री करणार अनेक विशेष घोषणा, करदात्यांना दिलासा ते...

2.40 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने निवेदनात म्हटले आहे की, 10 जानेवारी 2023 पर्यंतच्या कर संकलनाची सुरुवातीची आकडेवारी स्थिर वाढ दर्शवते. CBDT नुसार, या कालावधीत प्रत्यक्ष कर संकलनात 14.71 लाख कोटी रुपये होते, जे मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 24.58 टक्के अधिक आहे. परतावा समायोजित केल्यानंतर, CIT संकलनात 18.33 टक्क्यांची निव्वळ वाढ झाली.

निवेदनानुसार, 1 एप्रिल 2022 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान 2.40 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे. हा आकडा देखील वार्षिक आधारावर 58.74 टक्क्यांनी जास्त आहे.

Finance Minister Nirmala Sitharaman
Budget 2023: यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री करणार A,B,C,D चा उल्लेख! जाणून घ्या अर्थ

यावेळी आयकर सवलत मर्यादा वाढणार आहे

यावेळी, 2023-24 या वर्षाच्या अर्थसंकल्पात कर संकलनाच्या उत्साहवर्धक आकड्यांचा परिणाम दिसून येईल, अशी तज्ज्ञांना आशा आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) सादर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. अशा परिस्थितीत सरकार यावेळी आयकर सवलत मर्यादा अडीच लाखांवरुन पाच लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com