Cabinet Decision: मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 3 सहकारी संस्था होणार स्थापन; शेतकऱ्यांसह...

Cabinet Decision News: मंत्रिमंडळाने मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज (MSCS) कायदा, 2002 अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील बहु-राज्य सहकारी जैविक सोसायटीच्या स्थापनेला मान्यता दिली आहे.
Pm Narendra Modi
Pm Narendra Modi Dainik Gomantak

Union Cabinet Decision: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत 3 नवीन सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाने मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज (MSCS) कायदा, 2002 अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील बहु-राज्य सहकारी जैविक सोसायटीच्या स्थापनेला मान्यता दिली आहे.

खरेदीपासून मार्केटिंगपर्यंत सर्वांसाठी काम करेल

बहु-राज्य सहकारी जैविक सोसायटी ही सेंद्रिय उत्पादनांच्या एकत्रीकरणासाठी आणि त्याशिवाय खरेदी, ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी एक संयुक्त संस्था म्हणून काम करेल. मंत्रिमंडळाने मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज (MSCS) कायदा, 2002 अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील बहु-राज्य सहकारी निर्यात सोसायटी स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. सरकारच्या (Government) या निर्णयामुळे सहकाराच्या सर्वसमावेशक विकास मॉडेलच्या माध्यमातून ‘सहकार ते समृद्धी’ हे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होणार आहे.

Pm Narendra Modi
Kisan Scheme: शेतकऱ्यांच्या हितासाठी मोदी सरकारने उचलले 'हे' मोठे पाऊल, तुम्हीही म्हणाल...

UPI व्यवहाराला प्रोत्साहन दिले जाईल

RuPay डेबिट कार्ड आणि BHIM (UPI) च्या व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी देखील मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने 2022-23 साठी 2600 कोटी रुपयांची प्रोत्साहन रक्कम मंजूर केली आहे.

Pm Narendra Modi
Budget: 92 वर्षांनंतर मोदी सरकारने अर्थसंकल्पाबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय, ऐकून...

शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण होतील

भारतातील (India) सेंद्रिय उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी या सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. यासोबतच भारतीय सहकारी बियाणांनाही प्रोत्साहन मिळणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांच्या बियाणांसाठी त्याचा वापर केला जाणार आहे. शेतकऱ्यांची पुरवठा साखळी लक्षात घेऊन त्यांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com