ऑनलाईन बँक फसवणूक झाल्यास करा 'या' नंबरवर कॉल; मिनिटात पैसे परत मिळतील 

दैनिक गोमंतक
गुरुवार, 15 एप्रिल 2021

देशात एकीकडे कोरोना महामारीने पुन्हा थैमान घातले आहे.  अशा परिस्थितीतही ऑनलाइन मार्गाने फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हे लक्षात घेता दिल्ली पोलिसांनी ऑनलाइन बँक घोटाळ्यातील पीडितांना मदत करण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.

नवी दिल्ली:  देशात एकीकडे कोरोना महामारीने पुन्हा थैमान घातले आहे.  अशा परिस्थितीतही ऑनलाइन मार्गाने फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हे लक्षात घेता दिल्ली पोलिसांनी ऑनलाइन बँक घोटाळ्यातील पीडितांना मदत करण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. या क्रमांकावर तक्रार केल्यावरच काही मिनिटातच फसवणूकीद्वारे घेतलेली रक्कम खात्यात परत येईल. (Call 'this' number in case of online bank fraud; Money back in minutes)

Share Market Update : सत्र व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला 

हा आहे  हेल्पलाइन नंबर 
केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व प्रकारच्या सायबर क्राईमसाठी 155260 या हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे.  गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सहकार्याने हा हेल्पलाईन क्रमांक अधिक सक्षम करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू केले. दिल्ली पोलिसांनी त्यात आणखी 10 ओळी जोडल्या, ज्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे.  यानंतर ऑनलाईन फसवणूक  झालेल्या 23 जणांचे तब्बल 23.11 लाख रुपये परत मिळाले आहेत. यातली सर्वात मोठी रक्कम म्हणजे दिल्लीत राहणाऱ्या सेवानिवृत्त लेखापरीक्षकाची होती, त्यांची तब्बल 98,000 रुपयांची फसवणूक  झाली होती. 

फ्लिपकार्ट अदानी ग्रुपमध्ये सामील, 2500 लोकांना मिळणार रोजगार

असे कार्य करतो हा हेल्पलाइन नंबर 
केंद्रीय गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने हा  हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. तुमचे पैसे ज्या खात्यावर किंवा ज्या आयडीवर पैसे ट्रान्सफर झाले आहेत.  सरकारच्या  155260 हेल्पलाईनवरून त्या बँकेला किंवा ई-साइटवर
सतर्कतेचा संदेश पाठवते, त्यामुळे तुमचे पैसे ट्रान्सफर होण्यापासून थांबले जातात.  

अशी आहे पूर्ण प्रक्रिया 
जर तुमची फसणवून झाली असेल तर 155260 हा हेल्पलाइन क्रमांक डायल करा. यानंतर आपले नाव, मोबाईल नंबर, फसवणूकीची वेळ, बँक खाते क्रमांक याविषयी प्राथमिक चौकशी म्हणून माहिती मिळविली जाते.  पुढील कारवाईसाठी हेल्पलाइन नंबर आपली माहिती पोर्टलवर जाते.  त्यानंतर संबंधित बँकेला या फसवणूकीबद्दल माहिती दिली जाते.  एकदा माहितीची सत्यता पडताळून जाते आणि त्यानंतर फसवणूकीचा निधी  तुमच्या खात्यावर पूनह जमा केला जातो. 

संबंधित बातम्या