कॅम्पबेल विल्सन बनले एअर इंडियाचे MD

कॅम्पबेल विल्सन यांची एअर इंडियाचे CEO आणि MD म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कॅम्पबेल विल्सन बनले एअर इंडियाचे MD
Air IndiaDainik Gomantak

टाटा सन्सने कॅम्पबेल विल्सन यांची एअर इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीच्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, एअर इंडिया बोर्डाने विल्सन यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे, जी आवश्यक नियामक मंजुरींच्या अधीन आहे. विल्सन यांना एअरलाइन्समध्ये जवळपास 26 वर्षांचा अनुभव आहे.

एअर इंडियाचे (Air India) चेअरमन एन चंद्रशेखरन म्हणाले की, 'विल्सन हे विमान क्षेत्रातील दिग्गज असून त्यांनी अनेक क्षेत्रात काम केले आहे. एअर इंडियाला आशियातील एअरलाइन ब्रँड बनवण्यासाठी त्यांचा अनुभव उपयुक्त ठरेल. विल्सन हे सिंगापूर (Singapore) एअरलाइन्सच्या स्कूटचे 2011 मध्ये संस्थापक सीईओ होते. 2016 पर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली होती. यानंतर, त्यांनी SIA चे सेल्स आणि मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणूनही काम केले.'

Air India
एअर इंडिया AIASL मध्ये परीक्षेशिवाय मिळणार या पदांवर नोकरी

एअर इंडियाचे एमडी आणि सीईओ बनल्यानंतर विल्सन म्हणाले, “एअर इंडिया या नामांकित एअरलाइन्स कंपनीचे नेतृत्व करण्यासाठी निवड होणे हा एक सन्मान आहे. टाटा समूहाचा भाग असणे हा देखील सन्मान आहे. एअर इंडियाला पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवून द्यायचे आहे. मला एअर इंडियाचा भाग बनून खूप आनंद होत आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.