भारतातील काजूचा वापर वाढला, कोरोनानंतर रेकॉर्ड ब्रेक विक्री!

गेल्या काही वर्षांमध्ये भारत हा काजूचा सर्वात मोठा ग्राहक आहे
Cashews
CashewsDainik Gomantak

भारतीय पूर्वीपेक्षा जास्त काजू खात आहेत, उत्पादक आणि प्रोसेसर यांना कमी होत चाललेल्या निर्यातीपासून देशांतर्गत बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये भारत हा काजूचा सर्वात मोठा ग्राहक आहे, परंतु 2020 मध्ये जेव्हा कोविड-19 ने जगात थैमान घातलं तेव्हा वापराला मोठा फटका बसला होता. (Cashew Price)

लॉकडाऊन उठवण्यात आल्याने आणि अर्थव्यवस्था स्थिर झाल्यामुळे, लोक आरोग्यदायी खाद्यपदार्थांकडे वळले, ज्यात काजूचा समावेश होता. तसेच, प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी लोकं ड्रायफ्रूट खायला लागले. भारतातील काजूचा खप वर्षाला 300,000 टनांपेक्षा जास्त आहे, असे मुंबईस्थित सॅमसन ट्रेडर्सचे संचालक पंकज एम संपत यांनी सांगितले. साथीच्या रोगापूर्वी हा खप सुमारे 200,000 टनवर घिरट्या घालत होता.

Cashews
Income Tax Rule: सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम; आयकरचे 'हे' नियम बदलले

देशातील वापराच्या तुलनेत काजूचे उत्पादन वाढत नाही. अशा परिस्थितीत मागणी पूर्ण करण्यासाठी आफ्रिकेतून कच्चे काजू आयात केले जातात. 2021-22 मध्ये, भारताने 7.5 लाख टन काजूचे उत्पादन केले, तर या काळात कच्च्या काजूची आयात 9.39 लाख टन होती. मात्र, त्यानुसार त्याचा वापर वाढत असल्याने लवकरच ही आयात दहा लाख टनांचा टप्पा पार करणार असा अंदाज आहे.

देशातील काजूची प्रक्रिया करण्याची क्षमता 18 लाख टनांवर पोहोचली आहे, जी एका वर्षापूर्वी 1.5 दशलक्ष टन होती. काजूचा सर्वाधिक वापर उद्योगांमध्ये केला जातो, तर देशात काजूचा वैयक्तिक वापर फक्त 10 ते 15 टक्के आहे. काजू आणि कोको विकास संचालनालयाच्या (DCCD) तात्पुरत्या आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये भारताने 750,000 टन काजूचे उत्पादन केले. कच्च्या काजूची आयात वर्षभरात 939,000 टनांवर पोहोचली.

Cashews
भारतीय लष्कर आणि नौदलाची अग्निपथ योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया सुरू

सप्टेंबरपासून काजूचे दर वाढतील

काजूच्या मागणीच्या अनुषंगाने दरात फारशी वाढ झालेली नाही, परंतु सप्टेंबरनंतर सणासुदीचा हंगाम सुरू झाल्यानंतर काजूचे भाव वाढू लागतील. सध्या 950-1,200 रुपये किलोने विकले जाणारे प्रीमियम काजू 700-850 रुपये दराने विकले जात आहेत. एवढेच नाही तर सर्वसाधारणपणे काजूचा भाव आजही 550 ते 650 रुपये किलोपर्यंत आहे. येत्या काळात काजूच्या आणखी किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com