सीबीआयने कॅडबरी इंडियाविरूद्ध गुन्हा दाखल केला

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 18 मार्च 2021

सीबीआयने मोन्डेलिस इंडिया फूड्स लिमिटेड (जुनं नाव कॅडबरी इंडिया लिमिटेड) आणि केंद्रीय उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांविरूद्ध आयपीसी कलम 420 (बनावट) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

बद्दी: सीबीआयने मोन्डेलिस इंडिया फूड्स लिमिटेड (जुनं नाव कॅडबरी इंडिया लिमिटेड) आणि केंद्रीय उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांविरूद्ध आयपीसी कलम 420 (बनावट) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हिमाचल प्रदेशच्या बद्दी येथे भ्रष्टाचार केल्याचा आरोप आणि खोटी साक्ष देऊन खोटेपणाने तथ्य दाखविल्याप्रकरणी सीबीआयने मोन्डेलिस इंडिया फूड्स लिमिटेडविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. कॅडबरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आता मोन्डेलिस फूड्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जाते.

सीबीआयने म्हटले आहे की 2007 साली कंपनीने अतिरिक्त 10 वर्षांसाठी उत्पादन शुल्क व आयकरातून सूट मिळण्यासाठी बद्दी येथे युनिट तयार करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु कॅडबरी इंडियाने स्वतंत्र युनिट बांधण्याऐवजी कर सूट मिळविण्यासाठी विद्यमान युनिट वाढविले होते. बोर्नविटा तयार करण्यासाठी हे युनिट 2005 मध्ये तयार केले गेले होते.

संबंधित बातम्या