10 वर्षांत पहिल्यांदाच सेंट्रल बँकांवर आली सोनं विकण्याची वेळ

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

सर्वाधिक सोने विकणाऱ्या देशांच्या यादीत तुर्की आणि उझबेगिस्तान हे देश अव्वल क्रमांकावर आहेत. रशियाच्या  सेंट्रल बँकेने तर गेल्या 13 वर्षांत पहिल्यांदाच सोने विक्रीस काढले आहे.

नवी दिल्ली-  मागील दहा वर्षात पहिल्यांदाच जागतिक सेंट्रल बँकांनी सोने विकायला काढले आहे. कोविड काळात   सोन्याच्या किंमती खूप वाढल्या होत्या. त्यानंतर काही सोने उत्पादक देशांनी याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला. जागतिक गोल्ड कौन्सेलिंगच्या माहितीनुसार तिसऱ्या तिमाहीत सोन्याची एकूण विक्री सुमारे 12.1 टन इतकी झाली होती. सर्वाधिक सोने विकणाऱ्या देशांच्या यादीत तुर्की आणि उझबेगिस्तान हे देश अव्वल क्रमांकावर आहेत. रशियाच्या  सेंट्रल बँकेने तर गेल्या 13 वर्षांत पहिल्यांदाच सोने विक्रीस काढले आहे.

 गेल्या काही वर्षांत सेन्ट्रल बँकांनी बऱ्याच प्रमाणावर सोने खरेदी केले होते. सिटी ग्रुपने गेल्या महिन्यात लावलेल्या   अंदाजानुसार 2021 मध्ये पुन्हा एकदा केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करू शकतील. मागील दोन वर्षांत म्हणजे 2018 आणि 2019 मध्ये विक्रमी खरेदी केल्यानंतर या वर्षीच्या खरेदीमध्ये थोडा फरक जाणवला आहे.

सद्यस्थितीत तुर्की आणि उझबेगिस्तानच्या बँकांनी आपल्या सेंट्रल बँकेंच्या सोने साठवणुकीकडे जास्त लक्ष दिले आहे. तिसऱ्या तिमाहीत तुर्की आणि उझबेगिस्तानच्या केंद्रीय बँकांनी अनुक्रमे 22.3 टन आणि 34.9 टन इतकी सोन्याची विक्री केली होती. उभय देश आता आपली आंतरराष्ट्रीय राखीव संपत्ती अजून चांगल्या स्थितीत आणण्याच्या प्रयत्नात आहेत.  

सोन्याची खरेदी आणि विक्री का करतात या बँक? आपल्या देशातील चलनाचे अवमुल्यन लक्षात घेता, त्या त्या देशातील सेंट्रल बँक सोने खरेदी किंवा विक्रीचा निर्णय घेत असतात. एखाद्या देशातील डॉलरची किंमत वाढलेली असेल आणि तुलनेत त्या देशातील चलनात घट झाली असेल तर डॉलरच्या मार्फत केले जाणारे व्यवहार त्यांना वाजवी पडत नाहीत. त्याला पर्याय म्हणून मग सोन्याचा पुरेसा साठा करून या सेंट्रल बँक त्याचे रूपांतर चलनात करू शकतात.      
 

संबंधित बातम्या