Public Sector Banks: या बँक कर्मचाऱ्यांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिसूचना जारी

Public Sector Banks In India: सरकारने बँक कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अधिसूचना जारी केला आहे.
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanDainik Gomantak

Bank News: सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबाबत केंद्र सरकारकडून अनेक मोठे निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान, सरकारने बँक कर्मचाऱ्यांसाठी एक अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) यांचा कमाल कार्यकाळ 10 वर्षांपर्यंत वाढवला आहे. या पाऊलामुळे सरकारला बँकिंग क्षेत्रातील सर्वोत्तम प्रतिभा दीर्घ कालावधीसाठी टिकवून ठेवण्यास मदत होईल.

पहिला कालावधी 5 वर्षांचा होता

सरकारने (Government) 17 नोव्हेंबर 2022 रोजी अधिसूचना जारी करुन याबाबत माहिती दिली आहे. नियुक्तीचा कालावधी आधीच्या पाच वर्षांवरुन आता दहा वर्षे करण्यात आल्याचे सरकारने सांगितले आहे.

Nirmala Sitharaman
RBI Digital Rupee: रिझर्व्ह बँक आज लाँच करणार डिजिटल रूपया

आधी काय नियम होते माहित आहे?

यापूर्वी, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे (Bank) व्यवस्थापकीय संचालक किंवा कार्यकारी संचालक यांना जास्तीत जास्त पाच वर्षे किंवा वयाच्या 60 वर्षापर्यंत (जे आधीचे असेल) कालावधी मिळत असे. हेच निकष सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या पूर्णवेळ संचालकांसाठी लागू होते.

Nirmala Sitharaman
RBI गव्हर्नरने बँक ग्राहकांना दिली खूशखबर, जाणून तुम्हीही म्हणाल...

या लोकांना फायदा होईल

अधिसूचनेत म्हटले की, व्यवस्थापकीय संचालकांसह पूर्ण-वेळ संचालकांचा प्रारंभिक कार्यकाळ पाच वर्षांपेक्षा जास्त नसावा, जो वाढविला जाऊ शकतो, परंतु हा प्रारंभिक कार्यकाळासह दहा वर्षांपेक्षा जास्त नसावा. सरकारच्या या निर्णयामुळे 45 ते 50 वर्षे वयात पूर्णवेळ संचालक पदापर्यंत पोहोचलेल्या अशा प्रतिभावंतांना कायम ठेवण्यास बँकांना मदत होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com