14 लाख लोकांना रोजगार देणाऱ्या 'PM MITRA’ योजनेला मोदी सरकारने दिली मंजूरी

PM MITRA योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या 7 नवीन टेक्सटाईल पार्कवर सरकार पुढील 5 वर्षात अंदाजे 4,445 कोटी रुपये खर्च करणार आहे
14 लाख लोकांना रोजगार देणाऱ्या 'PM MITRA’ योजनेला मोदी सरकारने दिली मंजूरी
Central Government approve PM MITRA scheme will set up 7 new textile parksDainik Gomantak

केंद्रीय मंत्रिमंडळाने (Cabinet Meeting) बुधवारी 'पीएम मित्र' (PM MITRA) योजनेला मंजुरी दिली आहे . देशातील कापड क्षेत्राच्या (Textile Sector) मुख्य व्यपाराला पूर्ण आकार देणे हा या योजनेचा उद्देश असून यासाठी 7 नवीन टेक्सटाईल पार्क (Textile Parks) बांधण्यात येणार आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री (Minister of Commerce & Industry) पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी पत्रकार परिषदेत सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली आहे. (Central Government approve PM MITRA scheme will set up 7 new textile parks)

4,445 कोटींची गुंतवणूक

या योजनेबद्दल बोलताना पीयूष गोयल म्हणाले की, 'पीएम मित्र' योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या 7 नवीन टेक्सटाईल पार्कवर सरकार पुढील 5 वर्षात अंदाजे 4,445 कोटी रुपये खर्च करणार आहे त्याचबरोबर या योजनेचा उद्देश वस्त्रोद्योग क्षेत्रात देशाचे जुने वैभव परत आणणे असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच सांगितले आहे की, कापड क्षेत्रात आपल्याला 5 'F' पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. 'पीएम मित्र' योजना त्यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने काम करणार असल्याचे देखील पियुष गोयल यान इ स्प्ष्ट केले आहे . या 5 'F' चा अर्थ स्पष्ट करताना ते म्हणाले की, 'फार्म' (कापूस) पासून 'फायबर' (धागा), 'फॅक्टरी' (फॅशन), 'फॅशन' आणि 'परदेशी' ( निर्यात) भारतातच संपूर्ण व्यापाराची एक चेन तयार करेल.

Central Government approve  PM MITRA scheme will set up 7 new textile parks
पेट्रोल आणि डिझेलच्या दराने गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आजपर्यंत देशातील अशा एकात्मिक टेक्सटाईल पार्कवर फारसे काम झालेले नाही. यामुळे या क्षेत्रातील आमची किंमत वाढेल आणि जिथे आम्ही परदेशात निर्यात करण्यात मागे पडतो. 'पीएम मित्र' ही योजना नेमकी हीच कमतरता भरून काढेल.

14 लाख लोकांना मिळणार रोजगार

त्याचबरोबर 'पीएम मित्र' या योजनेअंतर्गत या 7 टेक्सटाईल पार्कमधून 7 लाख लोकांना थेट रोजगार मिळेल. त्याचबरोबर अप्रत्यक्षपणे या 14 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. अशी माहिती देखील गोयल यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com