
Central Government on Crude Oil: देशभरात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीने सामान्य नागरिक त्रस्त आहे. यातच, आता सरकारने कच्च्या तेलाबाबत मोठे पाऊल उचलले आहे.
केंद्र सरकारने देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावरील कर शून्यावर आणला आहे. याशिवाय, डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवर या कराचा शून्य दर कायम ठेवण्यात आला आहे. याबाबत शासन आदेश जारी करुन माहिती देण्यात आली आहे.
सरकारने ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) सारख्या कंपन्यांद्वारे उत्पादित कच्च्या तेलावरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (SAED) कमी करुन 4,100 रुपये प्रति टन केले आहे, असे अधिकृत आदेश सोमवारी सांगण्यात आले. नवे दर मंगळवारपासून म्हणजेच आजपासून लागू झाले आहेत.
देशांतर्गत उत्पादित तेलासाठी विंडफॉल गेन टॅक्स शून्यावर आणण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये ही शुल्क आकारणी करण्यात आली होती. तत्पूर्वी, एप्रिलच्या सुरुवातीला कर शून्य करण्यात आला होता, परंतु त्या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात तो वाढवून 6,400 रुपये प्रति टन करण्यात आला.
डिझेलच्या (Diesel) निर्यातीवरील शुल्क 4 एप्रिल रोजी शून्य करण्यात आले आणि त्याच पातळीवर कायम आहे. त्याचप्रमाणे, एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ) च्या निर्यातीवरील शुल्क देखील 4 मार्चपासून शून्य राहिले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 75 डॉलरच्या पातळीवर आली आहे, त्यानंतर विंडफॉल नफा करात कपात करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स 3,500 रुपयांनी कमी करण्यात आला आहे. यानंतर, देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स शून्यावर आला आहे.
यापूर्वी, सरकारने डिझेलवरील निर्यात शुल्क 0.50 रुपये प्रति लिटरवरुन 1 रुपये प्रति लिटर केले होते.
सरकारने (Government) जुलै 2022 मध्ये विंडफॉल कर लागू केला होता. कच्च्या तेलावरील कपात मंगळवारपासून लागू होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.