७वा वेतन आयोग: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार नवीन वर्षात खुशखबर

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

७व्या वेतन आयोगाच्या आधारे २०२१मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना जास्त पगार मिळणार असल्याची शक्यता आहे. कोरोना महामारीमुळे या वर्षात आर्थिक व्यवहार ठप्प झाले असताना केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यावर केंद्र सरकारने निर्बंध आणले होते.     

नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना येणाऱ्या वर्षात खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. ७व्या वेतन आयोगाच्या आधारे २०२१मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना जास्त पगार मिळणार असल्याची शक्यता आहे. कोरोना महामारीमुळे या वर्षात आर्थिक व्यवहार ठप्प झाले असताना केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यावर केंद्र सरकारने निर्बंध आणले होते.     

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सना २१ टक्के महागाई भत्ता मिळतो. मात्र, आता तो १७ टक्के एवढाच दिला जात आहे. केंद्र सरकारने ही व्यवस्था जून २०२१ पर्यंत केली आहे. केंद्र सरकार या महागाई भत्त्यांवर जून २०२१ पर्यंतर तोडगा काढेल अशी चर्चा आहे. हा निर्णय झाल्यास वेतनात आणि पेंशनमध्ये वाढ होणार आहे. केंद्र सरकारकडून दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये ही वाढ करण्यात येते.   

केंद्र सरकारने केलेल्या प्रतिबंधांचे ५० लाखांहून अधिक कर्मचारी आणि ५५ लाखांहून अधिक पेंशनरांवर परिणाम होत आहेत. कॅबिनेटने या वर्षाच्या सुरूवातीलाच महागाई भत्त्यामंध्ये चार टक्क्यांची वाढ केली होती. केंद्र सरकार किंमतींमधील वाढीच्या भरपाईसाठी महागाई भत्त्यांमध्ये वर्षातून दोनवेळा बदल करते. सरकारने मंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि खासदारांच्या पगारामध्ये ३० टक्के कपात केली होती.  

संबंधित बातम्या