PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak

Free TV: वाह मोदीजी! मोफत राशननंतर आता मिळणार फ्री TV; केंद्र सरकार उचलणार खर्च

Modi Governemnt News: सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध सुविधा पुरविल्या जात आहेत.

Modi Governemnt News: सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. मोफत धान्य देण्यासोबतच आता डिश टीव्ही मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

2,539 कोटी रुपये खर्च होणार आहेत

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओची स्थिती सुधारण्यासाठी 2,539 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय मोदी सरकारच्या (Modi Government) मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे.

PM Narendra Modi
Income Tax: आयकर भरणाऱ्यांसाठी आणखी एक अपडेट, अर्थमंत्र्यांनी जारी केलेला नवीन आदेश

मोफत डिश कोणाला मिळणार?

देशातील दुर्गम, सीमावर्ती आणि आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांना मोफत डिशची सुविधा दिली जाईल, असे सरकारने सांगितले आहे. या भागातील सुमारे 7 लाख लोकांच्या घरी मोफत डिश बसवण्यात येणार आहे. या योजनेद्वारे डीटीएचचा विस्तार करण्याची केंद्राची योजना आहे. यासोबतच जुनी स्टुडिओ उपकरणे आणि ओबी व्हॅन पूर्णपणे बदलण्याची योजना आखली जात आहे.

36 वाहिन्या दूरदर्शन अंतर्गत येतात

सध्या जवळपास 36 टीव्ही चॅनेल्स दूरदर्शनच्या अंतर्गत येतात. त्याचवेळी, यापैकी 28 प्रादेशिक वाहिन्या आहेत आणि आकाशवाणीकडे सध्या सुमारे 500 प्रसारण केंद्रे आहेत.

PM Narendra Modi
Income Tax: PM Modi साठी टाळ्या, आजपासून 'या' लोकांना भरावा लागणार नाही आयकर

शासनाने प्रसिद्धीपत्रक जारी केले

यामुळे देशातील रोजगारालाही (Employment) चालना मिळेल, असे सरकारने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यासह, सामग्रीचा दर्जा देखील सुधारला जाईल. देशभरात टीव्ही, रेडिओसह अनेक क्षेत्रात रोजगार निर्माण होणार असून, त्यामुळे तरुणांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी आहे.

PM Narendra Modi
Income Tax: मोदी सरकारने करुनच दाखवले! टॅक्समध्ये दिली तब्बल 50,000 रुपयांची सूट

व्हिडिओ गुणवत्ता सुधारेल

दूरदर्शनमध्ये मोठ्या बदलांसोबतच सरकार व्हिडिओचा दर्जाही सुधारणार आहे. यासोबतच जुने ट्रान्समीटरही बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन एफएम ट्रान्समीटर बसवणार असल्याचे सरकारने सांगितले आणि जुने ट्रान्समीटर अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com