
Modi Government: केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. ज्या लोकांना मोबाईल आणि टीव्हीसारखी नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करायची आहेत त्यांना हा दिलासा मिळणार आहे.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीवरील जीएसटी दर कमी होईल, अशी अपेक्षा होती आणि तसे झाले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार मोबाईल आणि टीव्हीच्या खरेदीवरील जीएसटी दर कमी करण्यात आला आहे.
यापूर्वी, मोबाईल आणि टीव्हीच्या खरेदीवर 31.3 टक्के जीएसटी आकारला जात होता, जो आता सरकारने 12 वरुन 18 टक्के केला आहे. त्यामुळे मोबाईल आणि टीव्ही खरेदी करणे पूर्वीच्या तुलनेत 19 टक्क्यांनी स्वस्त होणार आहे. हा नवीन GST दर 1 जुलै 2023 पासून लागू झाला आहे.
याआधी, 27 इंची टीव्हीची किंमत 32,825 रुपये होती, मात्र आता ग्राहकांना (Customers) त्यासाठी 29,500 रुपये मोजावे लागतील. तुम्ही 27 इंचांपेक्षा मोठा टीव्ही खरेदी केल्यास, तुम्हाला 32,825 रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे, 1 जुलैपूर्वी एका स्मार्टफोनची किंमत 32,825 रुपये होती, परंतु आता त्याच स्मार्टफोनसाठी तुम्हाला 28,999 रुपये मोजावे लागतील.
केंद्र सरकारने 1 जुलै 2023 रोजी जीएसटीच्या (GST) सहाव्या वर्धापनदिनानिमित्त 27 इंचांपर्यंतच्या टीव्ही आणि मोबाईलवरील कर दरांमध्ये सुधारणा केली आहे. अर्थ मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलनुसार, सरकारने मोबाईल खरेदीवर ग्राहकांना 31.3 टक्क्यांऐवजी 12 टक्के कर भरण्याची घोषणा केली आहे.
याच सवलतींसह रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, गीझर, पंखे, कुलर, एलपीजी स्टोव्ह आणि मिक्सर, ज्युसर यासारख्या गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीवर 18 टक्क्यांऐवजी 12 टक्के कर आकारला जाईल.
याशिवाय, एलईडीवर 12 टक्के कर लागू होणार आहे. व्हॅक्यूम क्लीनर आणि यूपीएसवरील जीएसटी दरही 28 टक्क्यांवरुन 18 टक्के करण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.