'या' तीन बँकांच्या Cheque Payment आणि IFSC कोडमध्ये 1 जून पासून होणार बदल...

'या' तीन बँकांच्या Cheque Payment आणि IFSC कोडमध्ये 1 जून पासून होणार बदल...
cheque.jpg

जर तुम्ही बँक ऑफ बडोदा (Bank of baroda), कॅनरा बँक (Canara Bank) आणि सिंडिकेट बँकेचे (syndicate bank) ग्राहक (Customer) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण या बँकांच्या नियमांमध्ये (Rules and Regulations) आता बदल करण्यात आले आहेत. बँक ऑफ बडोदाने चेकद्वारे केलेल्या पेमेंटशी (Cheque Payment) संबंधित असलेल्या प्रक्रियेत काही बदल केले आहेत, तर कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकेने आयएफएससी कोडच्या (IFSC Code) आवश्यकते संबंधित काही बदल केले असल्याचे समजते आहे. (Changes in Bank Check Payment and IFSC Code will take place on 1st June)

बँक ऑफ बडोदाचे चेक पेमेंट बदलले...
1 जून 2021 पासून बँक ऑफ बडोदाने चेकद्वारे केल्या जाणाऱ्या पेमेन्टमध्ये होणाऱ्या फसवणूकीच्या घटना रोखण्यासाठी ग्राहकांना 'पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन' अनिवार्य करणार आहे.
“ग्राहकांना विनंती आहे की लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या चेकची पुर्व सूचना आम्हाला द्यावी, जेणेकरुन सीटीएस क्लीयरिंगच्या (CTS clearing) वेळी बँक ग्राहकांशी संपर्क न साधता हाय-व्हॅल्यू चेक (High Value Cheque) पास करू शकेल.” असे बँक ऑफ बडोदाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर (Official Website) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच  फक्त 2 लाख रुपयांहून अधिक रकमेच्या व्यवहारासाठीच ग्राहकांना चेक तपशिलाचे पुष्टीकरण (Confirmation) करणे आवश्यक असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे. 

या तारखेला बदलणार कॅनरा आणि सिंडिकेट बँकेचे आयएफएससी कोड

1 जुलै 2021 रोजी त्यांच्या शाखांचे आयएफएससी कोड बदलतील, अशी माहिती कॅनरा बँकेने आपल्या ग्राहकांना दिली आहे. तर सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना 30 जून 2021 पर्यंत बदललेले आयएफएससी कोड बँकेच्या शाखेतर्फे सांगण्यात येतील. यासाठी या  ग्राहकांना बँकेच्या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल आणि बदललेले आयएफएससी कोड पहावे लागतील. 
दरम्यान, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सिंडीकेट बँक कॅनरा बँकेत विलीन झाली. त्याच वर्षी चांगल्या सेवा आणि सुविधा देण्यासाठी  बँक ऑफ बडोदामध्ये देना बँक, विजया बँकेने आणि आणखी एका मोठी बँकेचे विलीनीकरण करण्यात आले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com