चिनी बँका अनिल अंबानींकडून सगळे कर्ज वसूल करणार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना आणि चायना डेव्हलपमेंट बँक या तीन चिनी बँकांनी लंडनमधील कोर्टाला कळवून मागणी केली आहे. या बॅंका आता अनिल अंबानी यांच्याकडून कर्ज वसूलीसाठी सर्व कायदेशीर मार्गाचा वापर करणार आहेत. 

नवी दिल्ली- 22 मे 2020 रोजी ब्रिटनमधील न्यायालयाने भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे प्रमुख अनिल अंबानी  यांना तीन चिनी बँकाकडून घेतलेले कर्ज देण्याचे आदेश दिले होते. यासाठी न्यायालयाने 12 जून 2020 पर्यंतची मुदत दिली होती. अनिल अंबानी यांनी चीनच्या इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना आणि चायना डेव्हलपमेंट बँक या तिन्ही बँकांचे मिळून जवळपास 5 हजार 281 कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. आतापर्यंत अनिल अंबानी कर्जाची परतफेड करू न शकल्याने या चिनी बँका आक्रमक झाल्या आहेत. या बँकांनी म्हटलंय की, अनिल अंबानी यांच्याकडून कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी आम्ही सर्व कायदेशीर मार्गांचा पाठपुरावा करणार आहोत.  
इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना आणि चायना डेव्हलपमेंट बँक या तीन चिनी बँकांनी लंडनमधील कोर्टाला कळवून मागणी केली आहे. या बॅंका आता अनिल अंबानी यांच्याकडून कर्ज वसूलीसाठी सर्व कायदेशीर मार्गाचा वापर करणार आहेत. 
यापूर्वी 15 जून रोजी इंडस्ट्रिअल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायनाच्या नेतृत्वाखाली चिनी बँकांनी अनिल अंबानी यांच्या मालमत्तेची माहिती देण्याची मागणी केली होती. शुक्रवारी एडीजी ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी लंडनच्या न्यायालयात, आपला खर्च खूप कमी असून, सध्याचा खर्च पत्नी टिना अंबानी करत असल्याचं सांगितलं होतं. शुक्रवारच्या न्यायालयीन सुनावणीनंतर चिनी बँकांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, बँका त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांनी अंबानी यांना दिलेल्या कर्जांची वसूली करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व कायदेशीर मार्गांचा पाठपुरावा करण्यासाठी उलटतपासणीतून मिळालेल्या माहितीचा वापर करतील. 
अनिल अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू आहेत.  शुक्रवारी ब्रिटनमधील न्यायालयाला अनिल अंबानी यांनी सांगितले की, ते एक साधे व्यक्ती असून त्यांच्याकडे एकच गाडी आहे. तसेच त्यांनी त्यांच्या जवळ असणारे सर्व दागिने जानेवारी ते जून 2020 दरम्यान विकले होते, त्यातून त्यांना 9.9 कोटी रुपये मिळाले होते. गाड्यांच्या ताफ्याबद्दल विचारले असता अंबानी यांनी या सर्व सोशल मिडियावरील अफवा असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे रोल्स रॉईस कधीच नव्हती, असेही त्यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या