'या' बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, प्रसूती रजेनंतर इतके महिने मिळणार WFH

Citi Bank New Policy: खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक सिटी बँक इंडियाने महिला कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम (WFH) ही नवीन सुविधा सुरु केली आहे.
Citi Bank New Policy
Citi Bank New PolicyDainik Gomantak

Citi Bank New Policy: खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक सिटी बँक इंडियाने महिला कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम (WFH) ही नवीन सुविधा सुरु केली आहे.

\या सुविधेअंतर्गत, बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेच्या 26 आठवड्यांनंतर 12 महिन्यांपर्यंत वर्क फ्रॉम होम (WFH) चा लाभ घेता येईल.

बँकेने दिलेली ही सुविधा ऐच्छिक असेल. याशिवाय, महिला कर्मचारी गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीत गरजेनुसार तीन महिने घरुन काम करण्याची विनंती करु शकतात.

21 महिने घरात राहण्याची सुविधा!

दरम्यान, या प्रकारच्या धोरणाकडे नवीन उपक्रम म्हणून पाहिले जात आहे. अशाप्रकारे, बँकेद्वारे प्रदान केलेल्या सुविधेमुळे, गर्भवती महिला कर्मचारी 21 महिने घरी राहू शकतात.

बँकेचे एचआर प्रमुख आदित्य मित्तल म्हणाले की, सरकारने लागू केलेल्या प्रसूती रजेव्यतिरिक्त, सिटी ही पहिली बँक आहे जी वर्क फ्रॉम होम (WFH) धोरण राबवते. या नियमाचे पालन केल्यास गर्भवती महिला कुटुंब आणि कार्यालय यांच्यातील ताळमेळ राखू शकतील.

Citi Bank New Policy
जगात भारी! RBI गव्हर्नर शक्तीकांत दास ठरले सर्वोत्तम बॅंकर

5,000 लोकांना नोकरी देण्याची योजना आहे

मित्तल पुढे म्हणाले की, भारत (India) ही पहिली बाजारपेठ आहे, जिथे सिटी ग्रुपद्वारे एक्स्टेंडेड वर्क फ्रॉम होम (WFH) धोरण लागू केले जात आहे. हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा बँक अलीकडेच भारतातील ग्राहक बँकिंग व्यवसायातून बाहेर पडली आहे. येत्या दोन वर्षांत 5,000 लोकांची नियुक्ती करण्याची बँक योजना आखत आहे.

दुसरीकडे, Citi India मध्ये 30,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, त्यापैकी 38% महिला आहेत. सरकारी नियमांनुसार सध्या खासगी लिमिटेड कंपन्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना (Employees) 26 आठवड्यांची प्रसूती रजा दिली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com