CNG-PNG Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका, सीएनजी-पीएनजीचे पुन्हा वाढले दर

CNG-PNG Price Hike: सणासुदीच्या काळात महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे.
CNG-PNG
CNG-PNGDainik Gomantak

CNG-PNG Price Hike: सणासुदीच्या काळात महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सिटी गॅस वितरण कंपनी महानगर गॅस लि. (MGL) सीएनजीच्या दरात प्रति किलो 6 रुपयांनी वाढ केली आहे. याशिवाय, पाइप्ड कुकिंग गॅस (PNG) च्या किमतीत प्रति युनिट 4 रुपये (SCM) वाढ करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होतील.

मुंबईत 86 रुपये किलो भाव

त्यामुळे मुंबई आणि लगतच्या भागात वाहनांसाठी इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसची (CNG) किरकोळ किंमत 86 रुपये प्रति किलो झाली आहे. त्याच वेळी, घरगुती पीएनजीची किंमत प्रति एससीएम 52.50 रुपये असेल. सरकारने 1 ऑक्टोबरपासून गॅसच्या किमती 40 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

CNG-PNG
CNG-PNG स्वस्त, महानगर गॅसने केली दर कपातीची घोषणा; जाणून घ्या नवीन दर

नैसर्गिक वायूच्या किमती 40 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात

पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पेट्रोलियम किंमत आणि विश्लेषण कक्षाने 30 सप्टेंबर रोजी 1 ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी देशांतर्गत उत्पादित गॅसच्या किमतींमध्ये 40 टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी 1 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय किमतीचा हवाला देत गॅसच्या किमतीत 110 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.

CNG-PNG
CNG PNG Price: एकाच महिन्यात दुसऱ्यांदा CNG-PNG दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

दुसरीकडे, सरकार (Government) वर्षातून दोनदा 1 एप्रिल आणि 30 सप्टेंबर रोजी गॅसच्या किमतीत सुधारणा करते. एमजीएलने म्हटले आहे की, या दरवाढीनंतर सीएनजी आणि पेट्रोलमधील किमतीतील बचत 45 टक्क्यांवर आली आहे. त्याच वेळी, पीएनजी आणि एलपीजीमधील (lPG) हा फरक केवळ 11 टक्क्यांवर आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com