सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ..!

2 महिन्यांत 6.84 रुपयांनी महागले..
सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ..!
CNG Update : CNG प rice Hike Again Dainik Gomantak

CNG Update : सीएनजीच्या (CNG) दराने पुन्हा एकदा सर्वसामान्यांना धक्का दिला असून, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. गेल्या दोन महिन्यांत सीएनजीच्या दरात तब्बल 6.84 रुपयांनी वाढ झाली आहे.

CNG Update : CNG प rice Hike Again
आता फक्त ही 2 कागदपत्रे देऊन बनवा तुमच्या मुलाचे आधार कार्ड..!

कपात केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर अजूनही गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचा खर्चही वाढणार आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सीएनजीच्या दरात प्रति किलो 2.28 ने वाढ झाली आहे. त्याच वेळी, ग्रेटर नोएडा, नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजीच्या किमती 2.56 रुपयांनी वाढल्या आहेत.

CNG Update : CNG प rice Hike Again
'महंगाई डायन खाई जात है' आता खाण्यापिण्याचे भाव गगनाला भिडणार ? होलसेल निर्देशांकही वाढला

नवीन किंमती काय असतील

आतापर्यंत दिल्लीत एक किलो सीएनजीसाठी 49.76 रुपये मोजावे लागत होते. मात्र आता 52.04 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याच वेळी, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये एक किलो सीएनजीसाठी 58.58 रुपये मोजावे लागतील. या वर्षी ऑगस्टपासून दिल्लीत सीएनजीचे दर सुमारे आठ रुपयांनी वाढले आहेत. तुम्हाला सांगतो, वाढलेल्या किमती रविवारपासून लागू झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com