सर्वसामान्यांना दिलासा; कोणताही नवीन कर भरावा लागणार नाही

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

असा अंदाज वर्तविला जात होता की, मोदी सरकार साथीच्या आजारात होणाऱ्या अतिरिक्त खर्चाची भरपाई करण्यासाठी कोविड सेस लावण्याचा विचार करत आहे. 

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीमुळे मागील वर्षी देशाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. 16 जानेवारीपासून देशात कोरोना विषाणूविरूद्ध जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू झाली.अशा परिस्थितीत सरकारच्या खर्चावरही मोठा परिणाम झाला होता. आणि असा अंदाज वर्तविला जात होता की मोदी सरकार साथीच्या आजारात होणाऱ्या अतिरिक्त खर्चाची भरपाई करण्यासाठी कोविड सेस लावण्याचा विचार करत आहे. 

हि ठरणार स्वतंत्र भारतात फाशी मिळणारी पहिली महिला

सर्वसामान्यांना कोणताही नवीन कर भरावा लागणार नाही

आता सर्वसामान्यांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकारने म्हटले आहे की, सर्वसामान्यांवर कोणताही नवीन कर लावला जाणार नाही. त्याचबरोबर श्रीमंतांवर कोविड सेस लावण्याची मागणी करण्यात आली होती ती आता लादली जाणार नाही. 1 फेब्रुवारी 2021 रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अशी कोणतीही घोषणा केली नाही.

म्हणूनच कोविड सेस लागू न करण्याचा निर्णय झाला

संकटाच्या या काळात लोकांना आर्थिक बाबतीत अडचण होऊ नये असा विचार सरकार करत आहे. कोविड सेस लागू केल्यास लोकांच्या हातात येणारा पैसा कमी होईल आणि अशा परिस्थितीत लोक खर्च कमी करतील. त्यामुळे सरकारने नवीन कर लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्य परिस्थितीवर मात करण्यासाठी, लोकांनी पैसे खर्च करणे सरकारसाठी आवश्यक आहे, जेणेकरून देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याची मदत होईल.

आश्चर्यच! जीव वाचविण्यासाठी चक्क ट्रेनखालीच झोपली महिला

लॉकडाऊन दरम्यान, होते टैक्स डेफिसिट भरून काढण्यासाठी सरकार उत्पन्नावर सेस किंवा अधिभार लावू शकते असे कर अधिकाऱ्यांनी सुचवले होते. नुकसानाची पूर्तता करण्यासाठी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवले असे म्हटले जात आहे. यासोबतच राज्यांनीही दारूवरील उत्पादन शुल्क वाढविले आहे. आर्थिक घडामोडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारचा एक विभाग आणि कर सल्लागारांचे मत लसीच्या नावावर कर लावण्याच्या बाजूने होते.

संबंधित बातम्या