सणासुदीत सामान्य नागरिकांना दिलासा, पेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थे'

05 सप्टेंबर नंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये 15-15 पैशांची घट झाली होती. यावरून आठवडा भरात पेट्रोल-डिझेल 30-30 पैशांनी स्वस्त झाले.
सणासुदीत सामान्य नागरिकांना दिलासा, पेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थे'
Petrol-dieselDainik Gomantak

भारत: गणपती बाप्पाचे (Ganesh Chaturthi)आज आगमन झाले आहे. यानंतर पुढच्या दोन दिवसात गौरी येणार आहेत. सप्टेंबरमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती दोन वेळा घटल्या होत्या. सणासुदीत सलग चौथ्या दिवशी नागरिकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये बदल झालेले नाहीत.

Petrol-diesel
पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार नाहीत: केंद्रीय अर्थमंत्री

सरकारी तेल कंपन्यांनी काल गुरुवार 9 सप्टेंबर रोजी पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती (Petrol Diesel Price on 9th September ) जारी केल्या आहेत.

सणासुदीच्या काळात दिलासादायक बाब म्हणजे आज इंधनांच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. आज रविवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये घट झाल्यानंतर आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर असून नागरिकांसाठी दिलासादायक बाब आहे. गणपती बाप्पा आगमनाच्या दिवशी देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये 10 ते 15 पैशांपर्यंत पेट्रोल -डिझेलच्या किंमतीमध्ये घट करण्यात आली होती.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (Indian Oil Corporation) दिलेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी दिल्लीमध्ये(Delhi) पेट्रोलच्या किंमती 101.19 रुपये आणि डिझेलच्या किमती 88.62 रुपये प्रति लिटरवर स्थित आहेत. तर मुंबईमध्ये पेट्रोलच्या किंमती 107.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती 96.16 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. बाजारात इंधनाच्या किमतींमध्ये आज कोणताही बदल झालेला नाही. तरी अद्यापही किंमती उच्चांकी पातळीवरच आहेत.

या महिन्यात दोन वेळा घटल्या किमती :

या महिन्यात दोन वेळा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट झाली होती. या महिन्याच्या सुरुवातीला ,1 सप्टेंबरला भारतीय बाजारात सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 15-15 पैसे प्रति लिटरची कपात करण्यात आली होती. तसेच, 05 सप्टेंबर नंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये 15-15 पैशांची घट झाली होती. यावरून आठवडा भरात पेट्रोल-डिझेल 30-30 पैशांनी स्वस्त झाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com