ओमिक्रॉनचा कहर, पेट्रोल अन् डिझेलचा वापर झाला कमी मात्र...

जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात भारताच्या (India) पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत घट झाली असून महामारीच्या तिसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेला फटका बसू लागला आहे.
Petrol & Diesel
Petrol & Diesel Dainik Gomantak

देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत अधिकच भर पडू लागली आहे. याच पाश्वभूमीवर जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात भारताच्या पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) विक्रीत घट झाली असून महामारीच्या तिसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेला फटका बसू लागला आहे. हा परिणाम कामाच्या ठिकाणी गतिशीलता आणि विमान वाहतूक कमी झाल्यामुळे झाला आहे. लोकांनी बाहेर जाण्याचे प्रमाण कमी केले आहे, त्यामुळे पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचा वापर कमी झाला आहे.

डिझेलची विक्री कमी

डिझेलची विक्री, जी भारताच्या एकूण इंधनाच्या वापरामध्ये आणि औद्योगिक क्रियाकलापांपैकी सुमारे 40 टक्के आहे. डिसेंबर मधील याच कालावधीच्या तुलनेत 1-15 जानेवारी दरम्यान 14.1 टक्क्यांनी घसरुन 2.47 दशलक्ष टन झाली आहे. इंधन विक्रेत्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीवरुन समोर आले आहे. जानेवारी 2020 मध्ये डिझेलची विक्री सुमारे 8 टक्क्यांनी कमी झाली.

Petrol & Diesel
कर्जदारांना सानुग्रह अनुदान मिळणार; SBI ला 973.74 कोटी रुपये मंजूर

ओमिक्रॉनने लादलेल्या बंदीचा परिणाम

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Variant) वेगाने प्रसार झाल्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये स्थानिक निर्बंध लादण्यात आले आहेत, ज्यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला आहे. त्याच वेळी, आकडेवारी दर्शवते की, जानेवारी 1-15 दरम्यान, 9,64,380 टन पेट्रोलची विक्री झाली, जी डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत 13.81 टक्के कमी आहे. तथापि, जानेवारी 2020 च्या विक्रीच्या तुलनेत हे प्रमाण 5.66 टक्क्यांनी जास्त आहे.

जेट इंधन विक्री 13% कमी

जानेवारीच्या पहिल्या सहामाहीत जेट इंधनाची विक्री 13 टक्क्यांनी घसरुन 2,08,980 टन झाली, जी महिन्यापूर्वीच्या आकडेवारीच्या तुलनेत वार्षिक 7.34 टक्क्यांनी अधिक आहे. जानेवारी 2020 च्या आकडेवारीपेक्षा हे प्रमाण 38.2 टक्क्यांनी कमी आहे.

एलपीजी विक्री वाढली

एलपीजीची विक्री महिन्या-दर-महिन्यानुसार 4.85 टक्के आणि वार्षिक 9.47 टक्क्यांनी वाढून 1.28 दशलक्ष टन झाली आहे. जानेवारी 2020 च्या तुलनेत ते 15.25 टक्क्यांनी जास्त होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com