कोरोनामुळे शेअर बाजारात 882.61अंकांनी घसरण 

दैनिक गोमंतक
सोमवार, 19 एप्रिल 2021

देशभरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि होणारे मृत्यूमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. यामुळे गुंतवणूकदार देखील सावध झाले आहेत. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार  रेड मार्कवर उघडला आणि घसरणीवरच बंद झाला.

देशभरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि होणारे मृत्यूमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. यामुळे गुंतवणूकदार देखील सावध झाले आहेत. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार  रेड मार्कवर उघडला आणि घसरणीवरच बंद झाला.  मुंबई शेयर बाजाराचा सेन्सेक्स 882.61 अंकांनी घसरून 47,949.42 वर आला आणि राष्ट्रीय शेयर बाजार निफ्टी दिवसभराच्या चढउतारानंतर 258.40 अंकांनी घसरून 14,359.45 अंकांवर बंद झाला. (Corona caused the stock market to fall by 882.61 points) 

कोरोनाचा असाही परिणाम; लॉकडाऊनमुळे उद्योगांत 46 हजार कोटींचे नुकसान 

रेड मार्कवर उघडले होते प्रसिद्ध शेअर्स 
मोठ्या समभागांबद्दल बोलायचे  झाल्यास. आजच्या दिवसाची सुरवात रेड मार्कवर झाली होती. यावेळी  सन फार्मा, इन्फोसिस, डॉक्टर रेड्डी, टीसीएस, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, टेक महिंद्रा, रिलायन्स, आयटीसी, टायटन, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, मारुती, पॉवर ग्रिड, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, इंडसइंड बँक, एनटीपीसी इ. सर्व कंपन्यांच्या  शेअर्समध्ये चांगलीच घसरण झाली होती.  शेअर बाजाराची ही स्थिती प्री-ओपन दरम्यान होती.  सकाळी 9 वाजता सेन्सेक्स 491.98 अंक (1.01 टक्के) खाली 48340.05 वर होता. निफ्टी 276.50 अंक (1.89 टक्के) खाली 14341.40 वर होता.

शुक्रवारी शेअर बाजार हिरव्या चिन्हावर बंद झाला होता 
शुक्रवारी जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक कल पाहता बाजारात दिवसभर चढ-उतार दिसून आले. सेन्सेक्स 28.35 ने वाढून 48,832.03 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 36.40 अंकांच्या वाढीसह 14,617.85 अंकांवर बंद झाला.

इंजिन बनवताना झालेल्या एका चुकीमूळे होंडा ने परत बोलावल्या 78 हजार कार

हे घटक या आठवड्यात बाजाराची दिशा ठरवतील
तथापि,  विश्लेषकांनी या आठवड्यात शेअर बाजार खूप अस्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कमी व्यापार सत्रात आठवड्याभरातील बाजारातील कल,  कोरोना संक्रमण, जागतिक संकेत व कंपन्यांच्या तिमाही निकालाच्या कलमुळे निश्चित होईल. तथापि, बुधवारी राम नवमीला बाजारात सुट्टी असेल. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत  परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणूक आणि कच्च्या तेलाच्या किंमतीदेखील बाजाराची दिशा ठरवतील.

 

संबंधित बातम्या