क्रूझ शिपवरील शेफ कोविड 19 नंतरही कलीनरी( स्वयंपाक) मार्केटमध्ये टिकतील.

dainik gomantak
बुधवार, 10 जून 2020

परंतू क्रूझ शिपवर ज्या प्रकारे काळजी घेतली जाते तशी काळजी घेतली गेली तर ग्राहकाला या संकटकाळातही चांगले खाणे पुरविता येऊ शकते.

पणजी

आजच्या जगात वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य यांचा घनिष्ट संबंध आहे. कोरोना विषाणू अन्नाच्या चुकीच्या हाताळणीनेही पसरू शकतो.याबाबत बोलताना अमेरिका कॉलेज ऑफ कलिनरी आणि लँग्वेज आर्टसचे शेफ रायन फुर्तादो म्हणाले की, क्रूझ शिपवरील शेफ अन्नाची हाताळणी करताना स्वच्छतेची कडक अमलबजावणी करतात कारण त्यांना अन्न सुरक्षिततेचि काळजी असते.
सर्व मुख्य क्रूझ कंपन्या अन्न सुरक्षिततेसाठी जोखीम विश्लेषण आणि संकट नियंत्रण पॉईंट ( एचएसीसीपी) (HACCP) ची अमलबजावणी करतात.यामध्ये अन्न तयार करताना ते जैविक, रासायनिक, भौतिक तसेच रेडिओलॉजीकल संकटांपासून वाचविले जाते.
व्ययक्तीत स्वच्छतेसोबतच सर्व क्रूझ सदस्यांना विशेषतः अन्न तयार करणाऱ्यांना या (एचएसीसीपी) चे पालन करावे लागते. क्रूझ वरील शेफ हे वैयक्तिक स्वच्छतेबाबतीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळतात. ते दिवसातून दोनवेळा अंघोळ करतात. तसेच त्यांची नखे स्वच्छ आणि कापलेली असतात, त्यांचा गणवेश स्वछ धुतलेला असतो आणि त्याचे शूजही पॉलीश केलेले असतात.
पुढे बोलताना शेफ फुर्तादो म्हणाले की, क्रूझ शिपवरील सर्व ग्यालीवर फक्त हात धुण्यासाठीचे सिंक असतात व तेथे सर्व कर्मचारी आपले हात धुतील याची काळजी घेतली जाते. तसेच येथे भांडी धुण्यासाठी तीन विशेष सिंक असतात. येथे एका सिंकमध्ये भांडी धुतली जातात तर दुसऱ्या सिंकमध्ये धुतलेली भांडी पुन्हा मिसळली जातात तर तिसऱ्या सिंकमध्ये भांडी सॅनिटायझ केली जातात.
क्रूझ शेफच्या स्वच्छतेविषयीच्या या सवयीमुळे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होत आहे.
क्रूझ शिप वरील शेफ जेवण बनविताना अन्नासोबतच चाकू, कटिंग बोर्ड, स्टोकपोटलादेखील उघड्या हाताने स्पर्श करत नाहीत.याचबरोबर अन्न तयार करताना त्यांना स्वतःच्या तोंडाला हात लावण्याची परवानगी नाही .या सर्व सवयीमुळे हे शेफ कोरोनाच्या प्रसारपासून दूर राहतात.
अनेक क्रूझ कंपन्या स्वतःच्या स्वछतेची तपासणी करून घेतात. अमेरिकेतील यूएसपीएच (USPH),हेल्थ कॅनडा, ब्राझील मधील अनवीसा, ऑस्ट्रेलियन शिप सॅनिटायझेशन,शिप सॅनिटायझेशन फॉर युरोपियन युनियन इत्यादी संस्थांद्वारे क्रूझ शिप आपल्या स्वच्छतेची तपासणी करून घेतात. अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि प्रीव्हेन्शनस व्हेसल सॅनिटायझेशन प्रोग्राम नुसार ज्या क्रूझ शिपला 86 पेक्षा कमी गुण मिळतात अशा शिपवरील स्वच्छता समाधानकारक नाही असे समजले जाते.
स्वच्छतेचे परीक्षण अतिशय सखोल पातळीवर केले जाते.उदा.कॉफी मशिनखाली कॉफी सांडली आहे का?,फळांवर माशी आहे का?,राहिलेले अन्नाची योग्य विभागणी केली आहे का ? अशा अनेक गोष्टींची तपासणी होते,यामुळे क्रूझ वरील शेफ अन्न हाताळणी बाबत अतिशय काळजी बाळगतात.
शिपवर अन्न तयार करताना ते शिजवणे,हाताळणे व सर्व्ह करणे यामध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते.स्वच्छतेबाबतीतील हे नियम क्रूझ वरील शेफ लगेच आत्मसात करतात कारण त्यांना माहिती असते की स्वच्छतेच्या परीक्षणात याच नियमांचे निरीक्षण केले जाते.
शेफना स्वच्छतेविषयीचे हे नियम ज्यावेळी ते शेफचा कोर्स सुरू करतात त्यावेळी समजवून सांगितले जातात,व क्रूझवर कामाला लागल्यावर या नियमांची उजळणी होते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार अद्याप असा कोणताही पुरावा नाही की ज्याद्वारे हे सिद्ध होईल की अन्नाद्वारे श्वसन विकार पसरविणाऱ्या विषाणूचा प्रसार होतो.कोरोना विषाणूच्या वाढीसाठी मनुष्य अथवा प्राण्याची आवश्यकता असते,अन्नामध्ये ते वाढू शकत नाहीत.त्यामुळे जर अन्नधान्य तयार करणाऱ्या व्यक्तीनी आपली योग्य स्वच्छता राखली तर इतर सर्व सुरक्षीत राहतील.
पुढे बोलताना फुर्तादो म्हणाले की, सुरक्षा नियमावलीत विविध गोष्टींचा समावेश आहे यामध्ये मास्क,गोल्व्ह सारखी वैयक्तिक सुरक्षा उपकरणे वापरणे,सतत हात धुणे,ज्या ठिकाणी वारंवार स्पर्श होतो अशी ठिकाणे सॅनिटायझरने धुणे,खोकताना अथवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणे,अन्न बनविताना शारीरिक अंतर राखणे,या आजाराची लक्षणे समजून घेणे इ. गोष्टींचा समावेश आहे.याचबरोबर अन्न सर्व्ह करणाऱ्या स्टाफनेही वैयक्तिक स्वछता व शारीरिक अंतर राखणे या नियमांचे पालन केले पाहिजे.
कोविड19 मुळे अन्न सेवा देणारे उद्योग ठप्प झालेले नाहीत.
 

स्वच्छता राखण्याबाबत क्रूझ शेफसाठी काही टीप्स
जेवण बनविण्यापूर्वी हात स्वछ धुवा
दररोज अंघोळ करा,उन्हाळ्यात दोन वेळा अंघोळ करा
नेहमी तुमची नखे छोटी व स्वछ ठेवा
जेवणात केस पडू नये यासाठी डोक्यावर शेफची टोपी घाला
मांस व मासे बनविताना हाताला ग्लोव्हज घाला
हात सतत धुवा
जेवण बनविताना तोंडाला हात लावू नका
जेवण बनविल्यानंतर सर्व जागेचे निर्जंतुकीकरण करा

संबंधित बातम्या