CPI Inflation: आनंदाची बातमी, खाद्यपदार्थ झाले स्वस्त; किंमती एका वर्षातील...

CPI Inflation Rate in India: सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. महागाईच्या आघाडीवर गेल्या महिन्यात सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला.
Market
MarketDainik Gomantak

CPI Inflation Rate in India: सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. महागाईच्या आघाडीवर गेल्या महिन्यात सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाई (CPI महागाई) एक वर्षाच्या नीचांकी पातळीवर आली आहे. गुरुवारी सरकारने आकडेवारी जाहीर करुन याबाबत माहिती दिली आहे. नोव्हेंबर महिन्यात हा आकडा 5.88 टक्के होता. यावेळी हा आकडा 0.16 टक्क्यांनी घसरला आहे. चला तर मग बघूया खाद्यपदार्थ किती स्वस्त झालेत-

एका वर्षातील नीचांकी पातळी गाठली

किरकोळ महागाई (Inflation) डिसेंबर 2022 मध्ये 5.72 टक्क्यांच्या एका वर्षातील नीचांकी पातळीवर आली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, मुख्यतः खाण्यापिण्याच्या किमती कमी झाल्यामुळे त्यात घट झाली आहे.

Market
Retail Inflation: दिलासा, दिलासा! किरकोळ महागाई दर 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

NSO ने आकडेवारी जाहीर केली

ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई नोव्हेंबर 2022 मध्ये 5.88 टक्के आणि डिसेंबर 2021 मध्ये 5.66 टक्के होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये खाद्यपदार्थांची महागाई 4.19 टक्के होती, जी मागील महिन्यात 4.67 टक्के होती.

नोव्हेंबरपासून महागाई 6 टक्क्यांच्या खाली आहे

जानेवारी 2022 पासून रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सहा टक्क्यांच्या समाधानकारक पातळीच्या वर राहिल्यानंतर किरकोळ चलनवाढ नोव्हेंबरमध्ये 5.88 टक्के आणि डिसेंबरमध्ये 5.72 टक्क्यांवर आली.

Market
Inflation Rate: कर्जाचा EMI वाढणार, महागाईचा पुन्हा उडणार भडका

खाद्यपदार्थ किती स्वस्त झाले?

शहरांमधील खाद्यान्न महागाईबाबत बोलायचे झाल्यास, हा दर 2.80 टक्के आहे. त्याचवेळी, नोव्हेंबरमध्ये हा आकडा 3.69 टक्के होता. पालेभाज्या आणि भाज्यांचा महागाई दर 15.08 टक्क्यांवर आला आहे. याशिवाय, फळांबद्दल बोलायचे झाल्यास, त्याचा महागाई दर 2 टक्के आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा महागाई दर 8.51 टक्के, अंड्यांचा महागाई दर 6.91 टक्के आणि मसाल्यांच्या महागाईचा दर 20.35 टक्के राहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com