पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता; कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

Crude Oil Price Hike : कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर भारताला कच्च्या तेलाची महागडी किंमत घ्यावी लागणार आहे. यामुळे देशात पेट्रोल डिझेल पुन्हा महाग होऊ शकते.
Crude Oil Price Hike
Crude Oil Price HikeDainik Gomantak

Crude Oil Price Hike : युरोपियन युनियनने 2022 च्या अखेरीस रशियातून आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. युरोपियन युनियनच्या या निर्णयानंतर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 124 डॉलरवर पोहोचली आहे.

ब्रेंट क्रूड तेल सध्या प्रति बॅरल $123.80 वर व्यापार करत आहे. खरं तर, ब्रुसेल्समध्ये 27 EU नेत्यांची बैठक झाली ज्यामध्ये 2022 च्या अखेरीस रशियाकडून आयात होणाऱ्या दोन तृतीयांश कच्च्या तेलावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. (Crude Oil Price Hike)

Crude Oil Price Hike
रेल्वे कंपनीत इंजिनीअर्सची भरती, मिळणार 1.40 लाखांपर्यंत पगार

युरोपीय संघाच्या या निर्णयामुळे 35 टक्के कच्च्या तेलासाठी रशियावर अवलंबून असलेल्या युरोपीय देशांच्या अडचणी वाढणार आहेत. पण भारताच्या अडचणीतही वाढ होणार आहे. कारण कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर भारताला कच्च्या तेलाची महागडी किंमत घ्यावी लागणार आहे. यामुळे देशात पेट्रोल डिझेल पुन्हा महाग होऊ शकते.

त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा तर पडणारच, पण महागाईही वाढणार आहे. भारतात, 22 मार्च ते 6 एप्रिल 2022 दरम्यान पेट्रोल डिझेल आधीच 10 रुपये प्रति लिटरने महागले आहे. मात्र, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे.

पेट्रोलवर प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी उत्पादन शुल्क कमी करण्यात आले आहे. मात्र कच्च्या तेलाच्या किमतीत ज्याप्रकारे वाढ झाली, अशा स्थितीत पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळे महागाई आणखी वाढू शकते. असं असलं तरी पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीसाठी सरकारी तेल कंपन्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे.

यापूर्वी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 2008 नंतर प्रथमच 139 डॉलर प्रति बॅरलची सर्वोच्च पातळी गाठली होती. रशियातून कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला वेग आला आहे, तसेच चीनमध्ये कोरोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. खरं तर, चीनमध्ये लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे कच्च्या तेलाची मागणी वाढेल आणि पुरवठा कमी झाल्यामुळे किंमती आणखी वाढू शकतात.

चार महानगरांतील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर नजर टाकली तर दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये आहे. मुंबईत पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये, चेन्नईमध्ये 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये आणि कोलकात्यात 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com