क्रिप्टोकरन्सी मार्केट तेजीतच, बिटकॉइनही 55 हजरांच्या पार

गुंतवणूकदारांनी डिजिटल क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) खरेदी सुरूच ठेवल्याने बहुतांश क्रिप्टोकरन्सीच्या किमती आज वाढल्या आहेत .
Cryptocurrency price on high Bitcoin cross 55 thousand
Cryptocurrency price on high Bitcoin cross 55 thousandDainik Gomantak

गुंतवणूकदारांनी डिजिटल क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) खरेदी सुरूच ठेवल्याने बहुतांश क्रिप्टोकरन्सीच्या किमती आज वाढल्या आहेत .सोलाना(Solana), कार्डानो (Cardano) आणि पोल्काडॉट (Polkadot) वगळता, टॉप 10 मधील इतर सर्व सात क्रिप्टोकरन्सीची प्राईझ वाढल्या आहेतग . बिटकॉइन (Bitcoin), डोगेकोइन आणि इथेरियमच्या किंमतीमध्ये भरघोस वाढ झालेली पाहायला मिळत आहे. (Cryptocurrency price on high Bitcoin cross 55 thousand)

गेल्या सात दिवसांत फक्त बिटकॉइनच्या किंमतीत 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आणि बिटकॉइन मे महिन्यापासून ते सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. जगातील सर्वात मोठी आणि सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन, बुधवारी 7 टक्क्यांहून अधिक वाढून 55,109 वर व्यापार करत होती.

तर दुसरीकडे अन्य क्रिप्टोकरन्सी देखील गेल्या 24 तासांमध्ये चांगल्या स्थानी आहेत . इथर जी दुसरी सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी, 1.5 टक्क्यांनी वाढून सुमारे 3,551 डॉलरवर वर पोहोचलली आहे . मात्र इतर काही क्रिप्टोकरन्सी च्या किमती घसरल्या आहेत . तर स्टेलरमध्ये 9 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. त्याच वेळी, शिबा इनूमध्ये 78 टक्के वाढ झाली आहे.

दरम्यान, क्रिप्टो एक्सचेंज क्रॅकेनच्या मते, ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून बिटकॉइनचे व्यापारी प्रमाण ईथरच्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त आहे. इथर, बिनान्स कॉईन, सोलाना आणि डोगेकोइनमध्ये गेल्या सात दिवसांत मोठी वाढ झाली आहे.बिटकॉईनमधील क्रिप्टोकरन्सी व्यवहारांवर चीनच्या पहिल्या बंदीनंतर डिजिटल टोकनवर दबाव आला आहे. या वर्षी आतापर्यंत, बिटकॉइनमध्ये 89 टक्के वाढ झाली आहे. तथापि, मात्र हे अद्याप सुमारे 65 हजार डॉलर्सच्या रेकॉर्डपासून आणखीन दूर आहे.

Cryptocurrency price on high Bitcoin cross 55 thousand
कोरोना काळातही भारतीय अब्जाधीशांनी गाठला संपत्तीचा उच्चांक

दुसरीकडे एकूण या मार्केटचा विचार करता चीनचे सर्वात मोठे क्रिप्टो एक्सचेंज HOOBI ने आपला मूळ देश सोडून जगभर व्यापार करण्याचा निर्णय घेतला आहे . हुओबीच्या संस्थापकांनी त्यांच्या शेअरधारकांच्या बैठकीत मत नोंदवले की क्रिप्टो एक्सचेंजने वाढीव सरकारी तपासणीनंतर आपले गृह बाजार सोडले पाहिजे. त्या दिवशी नंतर, चिनी नियामकांनी देशातील सर्व क्रिप्टो व्यवहार आणि सेवांवर बंदीची घोषणा केली आहे . हुओबीने मैलँड चीनमधील नवीन वापरकर्त्यांसाठी नोंदणी बंद केली. दोन दिवसांनंतर, त्याने जाहीर केले की तो या वर्षाच्या अखेरीस सर्व व्यापार चीन थांबवेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com