कर्ज बुडव्या उद्योगपतींनो सावधान ! आता संपत्तीवर येणार टाच

दैनिक गोमंतक
शनिवार, 22 मे 2021

कोर्टाने केंद्र सरकारच्या (Central Government) 2019 च्या परिपत्रकाला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत. कर्जेबुडविणाऱ्या कंपन्यांच्या प्रमोटर्स विरोधात पर्सनल बँकरप्सी केस दाखल करण्यास कोर्टाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता कर्ज बुडव्या उद्योगपतींच्या वैयक्तीक संपत्तीवरही बँक दावा करु शकते.

नवी दिल्ली : बँकांची (Bank) कर्जे बुडविणाऱ्या बड्या उद्योगपतींना (Businessman) सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) चांगलीच चपराक दिली आहे. कर्ज बुडविणाऱ्या उद्योगपतींच्या संपत्तीवर दावा करण्याचा बँकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

कोर्टाने केंद्र सरकारच्या (Central Government) 2019 च्या परिपत्रकाला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत. कर्जेबुडविणाऱ्या कंपन्यांच्या प्रमोटर्स विरोधात पर्सनल बँकरप्सी केस दाखल करण्यास कोर्टाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता कर्ज बुडव्या उद्योगपतींच्या वैयक्तीक संपत्तीवरही बँक दावा करु शकते. देशात अशा कर्ज बुडव्या उद्योगपतींची यादी मोठी आहे. त्यांच्याकडून अपेक्षित वेगाने कर्ज वसूली होत नसल्याने केंद्र सरकारने इनसॉल्वन्सी अँड बँकरप्सी  कोडमध्ये बदल करत नवे नोटीफिकेशन 2019 मध्ये जारी केले होते. परंतु त्या विरोधात वेगवेगळ्या हाय कोर्टात जवळजवळ 75 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिकांविरोधात केंद्र सरकारने एकत्रित सुनावणीची मागणी केली. त्यानुसार न्यायाधीश नागेश्वर राव आणि न्यायाधीश रविंद्र भट्ट यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. 

कॅनरा आणि सिंडिकेट बँकेत अकाऊंट असेल तर ही बातमी नक्की वाचा

अनिल अंबानी, संजय सिंघल, वेणूगोपाल धूत, वाधवान यांच्यासह अनेक बड्या उद्योगपतींना मोठा धक्का मानला जात आहे. या उद्योगपतींची अनेक मोठ्या बँकेत कर्ज बुडविल्याची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे आता बँकांचा कर्जवसुलीसाठीचा संघर्ष कमी होईल आणि कर्ज घेणाऱ्यांवर देखील आपल्या संपत्तीवर टाच येण्याची भीती असेल. 

संबंधित बातम्या