कोण होणार एअर इंडियाचा तारणहार? बड्या कंपन्यांची माघार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 मार्च 2021

सरकारी विमानी कंपनी एअर इंडियाच्या संभाव्य खरेदीदारांची संख्या कमी होत  जात आहे. संध्या टाटा ग्रूप आणि स्पाइसजेटचे प्रवर्तक अजय सिंग यांच्यासह काही खरेदीदार एअर इंडिया खरेदीसाठी बोली लावणाऱ्यांमध्ये आहेत.

नवी दिल्ली: सरकारी विमानी कंपनी एअर इंडियाच्या संभाव्य खरेदीदारांची संख्या कमी होत  जात आहे. संध्या टाटा ग्रूप आणि स्पाइसजेटचे प्रवर्तक अजय सिंग यांच्यासह काही खरेदीदार एअर इंडिया खरेदीसाठी बोली लावणाऱ्यांमध्ये आहेत. एअर इंडियाच्या संचालक (वाणिज्यिक) मीनाक्षी मलिक यांच्या अध्यक्षतेखाली एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांचा एक गटही निविदाकारांच्या यादीत स्थान मिळवू शकलेला नाही. मीनाक्षी मलिक यांनी ही माहिती मिडियाला दिली आहे. आपल्याला व्यवहार सल्लागार अर्नेस्ट अँड यंग एलएलपी इंडिया (ईवाय) कडून ही माहिती मिळाली आहे. एअर इंडिया संस्थापक टाटा ग्रूप कडून विमान विकत घेण्याची शक्यता वाढली आहे. हा गट खरेदीदारांमध्ये आर्थिकदृष्ट्या सर्वात मजबूत आहे.

कर्मचाऱ्यांना पाठविले पत्र

मलिक यांनी एअर इंडियाच्या सुमारे 200 कर्मचार्‍यांना पत्र लिहिले आहे. “EY कडून ईमेल आला आहे. यामध्ये एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांना कळविण्यात आले आहे की निर्गुंतवणूक संपादन प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात आपण अपात्र ठरलो आहोत,” असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे.

काय आहे EY इमेल

ईवायच्या मेलने म्हटले आहे की, एअर इंडिया खरेदी करण्यासाठी मलिक यांच्या नेतृत्वात कर्मचार्‍यांच्या गटाने दाखल केलेल्या रुचिपत्राचे (ईओआय) आणि सहायक कागदपत्रांचे मूल्यांकन केले गेले आहे. कंपनीच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसंदर्भात प्राथमिक माहिती ज्ञापनपत्रात देण्यात आलेल्या पात्रतेनुसार ती पूर्ण करीत नाही असे आढळले. त्यामुळे आवश्यकतेच्या अनुपस्थितीत कर्मचाऱ्यांचा गट निर्गुंतवणूक संपादन प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी अपात्र ठरला आहे.

इंटरअॅप्स इंक यापूर्वीच माघार घेतली आहे.
न्यूयॉर्कस्थित इंटरअॅप्स इंक कंपनीने एअर इंडियाच्या बिडर्सकडून आपले नाव यापूर्वीच मागे घेतले आहे. आता ही यादी आणखी लहान झाली आहे. पुढील आर्थिक वर्षात एअर इंडियाची विक्री प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. एअर इंडियाच्या या  बोलीवर अद्याप स्पाइसजेट किंवा प्रवर्तक अजयसिंह यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. सिंग यांच्यासह काही जण वैयक्तिक क्षमतेच्या आधारे बोली लावणार असल्याची माहिती मिळाली आहे.

संबंधित बातम्या