नफा वसुलीमुळे सेन्सेक्‍समध्ये घसरण

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 23 जानेवारी 2021

पन्नास हजारांचा टप्पा गाठणाऱ्या सेन्सेक्‍समध्ये आजही नफावसुलीने निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली. सेन्सेक्‍स आज 746 अंशांनी, तर निफ्टी 218 अंशांनी घसरला.

मुंबई : पन्नास हजारांचा टप्पा गाठणाऱ्या सेन्सेक्‍समध्ये आजही नफावसुलीने निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली. सेन्सेक्‍स आज 746 अंशांनी, तर निफ्टी 218 अंशांनी घसरला. निर्देशांकांमध्ये आज दीड टक्का घसरण झाल्याने दिवसअखेर सेन्सेक्‍स 48,878 अंशांवर, तर निफ्टी 14,371 अंशांवर स्थिरावला.

आज आयटी तसेच वाहन उद्योग क्षेत्रातील समभाग वाढले; मात्र बॅंका, धातू उद्योग यांच्या समभागांचे दर घसरल्याने निर्देशांक कोलमडले. आज सेन्सेक्‍समधील प्रमुख 30 समभागांपैकी फक्त बजाज ऑटो, हिंदुस्थान युनिलिव्हर, टीसीएस, बजाज फिनसर्व्ह आणि इन्फोसिस हेच समभाग वाढ दाखवत बंद झाले.

संबंधित बातम्या