Chat GPT: चॅटजीपीटीला टक्कर द्यायला गुगल आणणार डीप माइंड

Chat GPT: DeepMind चे सीईओ डेमिस हॅसबिसने म्हटले आहे की ,या स्पॅरो चॅटबोटला लॉंच करण्यात वेळ लागत आहे कारण यात ती सगळी वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात येत आहे जी चॅट जीपीटीमध्ये नाहीत.
Chat GPT
Chat GPTDainik Gomantak

Chat GPT: चॅट जीपीटी येणार असल्याचे जेव्हापासून घोषणा केली आहे, तेव्हापासून चॅट जीपीटीची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे. चॅट जीपीटीची वैशिष्ट्येदेखील लोकांना भुरळ घालणारी आहेत.

चॅट जीपीटी माणसांना लेख लिहून देण्यात मदत करणार असल्याची माहीती जीपीटीबाबत देण्यात आली होती. त्याचबरोबर लोकांना बिझनेसमध्येदेखील चॅट जीपीटी मदत करणार आहे. चॅट जीपीटीबाबत म्हटले जाते की,हे गुगलला टक्कर देऊ शकते.या पार्श्वभूमीवर गुगलने आता एक नवीन घोषणा केली आहे. गुगल चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी डीप माइंड ( Deep Mind ) लॉंच करण्याच्या तयारीत आहे.

कंपनीने असा दावा केला आहे की, हे चॅटबोट जास्त सुरक्षित आर्टीफिशिअल इंटेलिजिन्स असेल. डीपमाइंड गेल्या दशकापासून AI संशोधनात काम करत आहे. 9 वर्षांपूर्वी Google ने विकत घेतले होते. ChatGPT सतत चर्चेत राहिल्यानंतर DeepMind चे सीईओ डेमिस हॅसबिसने यावर आपले मत मांडले आहे. कंपनी लवकरच आपला चॅटबॉट स्पॅरो प्रायव्हेट बीटा म्हणून लॉन्च करू शकते. स्पॅरो गेल्या वर्षी एक शोधनिबंध संकल्पना म्हणून जगाला दाखवण्यात आली होती.

Chat GPT
PM Kisan Scheme: मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट! PM किसान योजनेत मिळणार 8 हजार रुपये

दरम्यान, DeepMind चे सीईओ डेमिस हॅसबिसने म्हटले आहे की ,या स्पॅरो चॅटबोटला लॉंच करण्यात वेळ लागत आहे कारण यात ती सगळी वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात येत आहे जी चॅट जीपीटीमध्ये नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com