
Phone Tapping Case: कर्मचार्यांच्या बेकायदेशीर फोन टॅपिंगशी संबंधित अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोंदवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांना जामीन मंजूर केला.
दरम्यान, ईडीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 2009 ते 2017 दरम्यान एनएसई कर्मचार्यांच्या (Employees) फोन टॅपिंगशी संबंधित मनी लाँडरिंग प्रतिबंधक प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. रामकृष्ण आणि एनएसईचे रवी नारायण आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
तसेच, आधीच या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या रामकृष्ण यांना न्यायमूर्ती जसमीत सिंग यांनी जामीन मंजूर केला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने त्यांना ईडी प्रकरणात जामीन देण्यास नकार दिला होता. 8 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांचे माजी प्रमुख संजय पांडे यांनाही मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात जामीन मंजूर केला होता.
दुसरीकडे, कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय फोन टॅप करणे किंवा कॉल रेकॉर्ड करणे हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे, असे न्यायमूर्ती सिंह म्हणाले. न्यायमूर्ती सिंह यांनी नमूद केले की, संमतीशिवाय फोन कॉल टॅप करणे किंवा कॉल रेकॉर्ड करणे हे घटनेच्या कलम 21 नुसार गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.