क्रेडिट कार्डची वाढती 'डिमांड' अर्थचक्र रूळावर येत असल्याचे चिन्ह आहे का?

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ऑक्टोबर महिन्यात क्रेडीट कार्डची विचारपूस करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. म्हणजे कोविड नंतर आता अर्थव्यवस्था खुली होण्याची ही चिन्हे आहेत.  

नवी दिल्ली-  भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे गती मिळाली नसल्याचे चित्र असले तरी एका गोष्टीमुळे अर्थचक्र परत रूळावर येत असल्याचा आशावाद आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ऑक्टोबर महिन्यात क्रेडीट कार्डची विचारपूस करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. म्हणजे कोविड नंतर आता अर्थव्यवस्था खुली होण्याची ही चिन्हे आहेत.  
 
 निमशहरी भागातही क्रेडीट कार्डची क्रेझ-   
देशातील एँड इनसाइट क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रान्सयुनियन सीबील कंपनीच्या आकडेवारीनुसार, बिगर मेट्रो शहरांमध्येही क्रेडिट कार्डची लोकप्रियता वाढत आहे. ही शहरे पारंपरिक पद्धतीने अधिक रोख रकमेचा वापर करत असतात. परंतु, आता तिथेही डिजीटल पेमेंट वाढताना दिसत आहेत. सध्या मेट्रो शहरांमध्ये रोख रकमेऐवजी डिजिटल पेमेंटचा जास्त वापर होत आहे.

मोठ्या मेट्रो शहरांमध्ये क्रेडिट कार्डचे ग्राहक वाढत आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये क्रेडिट कार्डची माहिती जाणून घेण्यामध्ये 23 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे मागील वर्षीच्या तुलनेत मेट्रो किंवा मोठ्या शहरांतील क्रेडिट कार्डची चौकशी 10 टक्क्यांनी कमी झाली आहे.

क्रेडिट कार्ड्सच्या संख्येतही वाढ-
ट्रान्सयुनियन सीबीलच्या मते, अर्थव्यवस्थेत क्रेडिट कार्डच्या मागणीत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसत आहे. तसेच नवीन क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची संख्याही वाढत आहे. जुलै महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्रेडिट कार्डची संख्या 2019 च्या जुलै  महिन्या इतका झाला आहे. लॉकडाऊनच्या काळातही एप्रिल 2020 मध्ये क्रेडिट कार्डची घसरण वेगवान नव्हती. त्याकाळात फक्त 9 टक्क्यांची घट दिसली होती.

 

संबंधित बातम्या