योजनेचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल बॅंकिंग आवश्यक: सीतारामन
Finance Minister Nirmala SitharamanDainik Gomantak

योजनेचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल बॅंकिंग आवश्यक: सीतारामन

डिजिटायझेशनची (Digitization) तात्काळ अमंलबजावणी करावी जेणेकरुन सरकारी योजनांचा लाभ समाजातील गरीब आणि मागास घटकांपर्यंत पोहोचेल.

सरकारी योजनांचा लाभ तळागळातील प्रत्येक घटकाला मिळवून देण्यासाठी मोदी सरकार जास्तीत जास्त डिजिटल सेवासुविधांवर भर देत आहे. अशातच आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी म्हटले आहे की, बँकांनी (private sector) डिजिटायझेशनची तात्काळ अमंलबजावणी करावी जेणेकरुन सरकारी योजनांचा लाभ समाजातील गरीब आणि मागास घटकांपर्यंत पोहोचेल. तामिळनाडू मर्कंटाइल बँकेच्या (Tamil Nadu Mercantile Bank) शताब्दी समारंभाला संबोधित करताना अर्थमंत्र्यांनी रविवारी सांगितले की, डिजिटल सुविधांचा लाभ घेणाऱ्या गरजू लोकांच्या तपशीलांची पडताळणी केल्यानंतर बँकिंग कॉरस्पॉन्डेंटच्या माध्यमातून सरकारकडून मंजूर करण्यात आलेली आर्थिक मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवता येऊ शकते.

अर्थमंत्री पुढे म्हणाल्या, "पंतप्रधानांना (Prime Minister) माहित आहे की, बँकिंग साक्षरता किती महत्त्वाची आहे ती, त्यामुळे जन धन योजनेअंतर्गत शून्य शेष असणाऱ्या खात्याला परवानगी देण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यांनी सुनिश्चित केले की प्रत्येक नागरिकांचे बँक खाते असावे आणि त्यांनी RuPay कार्डच्या माध्यमातून व्यवहार केला पाहिजे. "बँकिंग क्षेत्रात डिजिटलायझेशनद्वारे वेगाने बदल होत आहेत.

Finance Minister Nirmala Sitharaman
Union Budget 2021 : आज सकाळी 11 वाजल्यापासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत

बँकिंग सुविधेसाठी सर्वच ठिकाणी आवश्यकता नाही

तसेच अर्थमंत्री म्हणाल्या की, आज प्रत्येक ठिकाणी बँकेच्या शाखा उघडण्याची गरज नाही. आज आपण तिथे राहणाऱ्या लोकांच्या बँक खात्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी सर्व प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तुतीकोरिनमध्ये बसूनही, एखाद्या छोट्या गावात राहणाऱ्या व्यक्तीच्या बँकिंग गरजा तंत्रज्ञानाद्वारे पूर्ण करता येतात. ते म्हणाले की, आज तामिळनाडू मर्कंटाइल बँक सारख्या बँकांनी तंत्रज्ञानाशी संबंधित उपायांचा अवलंब करणे अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरून ते अधिक कार्यक्षम होतील.

बँकिंग क्षेत्रासाठी संधी

सीतारमण म्हणाल्या, "बँकिंगसाठी सुविधा विकसीत करण्यासाठी प्रचंड संभावना आहेत. मला असं वाटत आहे की, डिजिटलायझेशन पूर्ण झाले पाहिजे. डिजिटलायझेशन आपल्या स्वतःच्या आणि ग्राहकांच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. तामिळनाडू मर्केंटाइल बँकेने आपल्या सर्व ग्राहकांना बॅंकींग सुविधेशी जोडले पाहिजे आणि आर्थिक समावेशनही लागू केले पाहिजे."

Finance Minister Nirmala Sitharaman
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झालेली वाढ ही खेदजनक - अर्थमंत्री निर्मला सीतारमण 

जन धन योजनेची स्तुती केली

तमिळनाडू मर्कंटाइल बँकेच्या लाभार्थीला प्रधानमंत्री स्वनिधि योजना योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिल्यानंतर सीतारामन म्हणाल्या की, तुम्ही इडली विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या महिलेला धनादेश देत आहात. तुम्ही ही आर्थिक मदत पोहोचवू शकलात कारण प्रधानमंत्री जन धन सारखी योजना प्रत्येकापर्यत पोहोचली. "जर ही योजना नसती तर तुम्ही ही मदत देऊ शकला नसता. हे शक्य झाले कारण, प्रधानमंत्री जन धन योजना 2014 मध्ये सुरु करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com