मंदिराने लावली 16 लाखांच्या महिंद्रा थारची बोली, व्यावसायिकाने घेतली 43 लाखांत विकत

सध्या भारतीय बाजारपेठेत या एसयूव्हीची किंमत 13.53 लाख ते 16.03 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
 Mahindra Thar
Mahindra TharTwitter

तिरुवनंतपुरम: केरळमधील त्रिशूर येथील गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिराला महिंद्रा ग्रुपने (Mahindra Group) भेट दिलेली महिंद्रा थार सोमवारी लिलावात 43 लाख रुपयांना विकली गेली. दुबईतील एका व्यावसायिकाने ती कार विकत घेतली. या लिलावात 14 जणांनी भाग घेतला होता. लिलावाच्या अनेक फेऱ्यांनंतर अखेर दुबईस्थित उद्योगपती विघ्नेश विजयकुमार यांनी ती विकत घेतली. विघ्नेशच्या वतीने त्याचे वडील विजयकुमार यांनी बोलीत भाग घेतला होता. (Guruvayur Temple Mahindra Thar)

थारच्या (Mahindra Thar) नवीन मालकाला ताबा घेण्यापूर्वी 12 टक्के जीएसटी भरावा लागेल. विघ्नेशच्या वतीने त्याचे वडील विजय कुमार यांनी लिलावामध्ये भाग घेतला होता हे लक्षात घेण्यासारखे आहे. महिंद्रा समूहाने नोव्हेंबर 2021 मध्ये मंदिराला ही थार एसयूव्ही कार भेट दिली आणि डिसेंबरमध्ये ती 15 लाखांच्या मूळ किंमतीसह लिलावासाठी ठेवण्यात आली.

 Mahindra Thar
Cyber Insurance काळाची गरज, तुम्हीही पॉलिसी काढायच्या विचारात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा

त्यावेळी फक्त एकच खरेदीदार ती खरेदी करण्यासाठी पुढे आला होता आणि त्याने बोलीमध्ये 10,000 रुपयांची वाढ करून बोलीमध्ये कोणीही सहभागी न झाल्याने ती मिळवली होती. मात्र, याला तीव्र विरोध झाल्याने मंदिराच्या मंडळाने लिलाव रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी, बोलीमध्ये सहभागी झालेल्या एकमेव खरेदीदाराने मंदिर प्रशासनाला कायदेशीर कारवाईची धमकी दिली होती.

 Mahindra Thar
एअरटेलने यूजर्सला दिला झटका, रिचार्ज प्लॅनमधून काढून टाकली ही मोठी सेवा

या संदर्भात लिलाव जिंकलेल्या विजयकुमार यांनी मीडियाला सांगितले की, त्यांचा मुलगा दुबईत (Dubai) आहे, ही एसयूव्ही त्यांच्यासाठी खूप खास आहे. भगवान गुरुवायूरप्पन यांचे वाहन असल्याने ते विकत घेतले पाहिजे असे त्यांचे मत होते. विजयकुमार म्हणाले, “माझ्या मुलाने मला हे महिंद्रा थार कोणत्याही किंमतीत विकत घेण्यास सांगितले. सध्या भारतीय बाजारपेठेत या एसयूव्हीची किंमत 13.53 लाख ते 16.03 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. या किमती वेगवेगळ्या प्रकारांवर अवलंबून असतात

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com